पाकिस्तान-बांगलादेश कसोटीदरम्यान ‘या’ खेळाडूच्या घरी हलला पाळणा, आफ्रिदीचंही खास कनेक्शन
पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे पार पडला जात आहे. अशातच पाकिस्तानचा एक स्टार खेळाडू बापमाणूस झाला आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिला सामना रावळपिंडी येथे पार पडला जात असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा स्टार खेळाडू बापमाणूस झाला आहे. कसोटी क्रिकेट खेळत असताना त्याला ही आनंदाची बातमी आली. या खेळाडूचे पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीसोबतही खास कनेक्शन आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. शाहीन आफ्रिदी शनिवारी वडील झाला. शाहीनची पत्नी अंशा आफ्रिदीने मुलाला जन्म दिला आहे. आफ्रिदीच्या कुटुंबीयांनी शनिवारी सोशल मीडियावर चाहत्यांना ही खुशखबर दिली. यावेळी जगभरातील चाहते आणि हितचिंतकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाहिदच्या कुटुंबीयांनी मुलाचे नाव अली यार ठेवले आहे. रावळपिंडी येथे सुरू असलेल्या पहिला कसोटी सामना खेळत आहे.
شاہین آفریدی اور اس کی اہلیہ کے ہاں بیٹے کی پیدائش۔۔۔۔۔
Congratulation’s Shaheen Afridi Family😍💝@iShaheenAfridi pic.twitter.com/aMDCYBHcte— @nazakatspeaks (@MahrNazakat1287) August 24, 2024
शाहीन आफ्रिदी आणि अंशा यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लग्न केलं होतं. अंशा आफ्रिदी ही पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे. शाहिनला मुलगा झाल्याने शाहिद आफ्रिदी आजोबा झाला आहे. पाकिस्तानचे कोच जेसन गिलेस्पी यांनी शाहिदला ब्रेक घेतला तरी चालणार असल्याची मुभा दिली आहे. शाहीन आफ्रिदीने 30 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 70 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये अनुक्रमे 113 विकेट्स, 104 विकेट्स आणि 96 विकेट घेतल्या आहेत.
सामन्याचा थोडक्यात आढावा
पाकिस्तान आणि बांगलादेशमधील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४४८-६ धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशने ५६५ वर ऑल आऊट झाला आहे. आता बांगलादेशकडे ११७ धावांची आघाडी आहे.