AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup : भारतात वर्ल्ड कप खेळण्याबाबत पाकिस्तानने भूमिका घेतलीच, PCB चेयरमन म्हणाले…

रमीज राजा यांनी थेट टीम इंडिया एशिया कपसाठी पाकिस्तानात आली नाही, तर आम्हीपण भारतात वर्ल्ड कपसाठी जाणार नसल्याची भूमिका घेतली होती.

ODI World Cup : भारतात वर्ल्ड कप खेळण्याबाबत पाकिस्तानने भूमिका घेतलीच, PCB चेयरमन म्हणाले...
Image Credit source: फाईल फोटो
| Updated on: Dec 27, 2022 | 5:05 PM
Share

इस्लामाबाद : आगामी 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचं (Icc Odi World Cup 2023) यजमानपद हे भारताकडे आहे. टीम इंडियाचं (Indian Cricket Team) वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न हे गेल्या 11 वर्षांपासून अधुरंचं राहिलंय. त्यामुळे या वर्ल्ड कपबाबत भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. मात्र या दरम्यान पाकिस्तानची भलतीच नाटकं सुरु आहेत. भारतात या वर्ल्ड कपसाठी यायचं की नाही, यावरुनच पाकिस्तानची नापाक खेळी सुरु आहे. विशेष म्हणजे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानची नाटकं आणखी वाढलीयेत. नक्की पीसीबीची भूमिका काय आहे, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (pakistan go or not government will be desided says pcb chairman najam sethi icc odi world cup 2022 team india cricket news)

पीसीबीचे माजी चेयरमन असलेले रमीज राजा यांनी थेट टीम इंडिया एशिया कपसाठी पाकिस्तानात आली नाही, तर आम्हीपण भारतात वर्ल्ड कपसाठी जाणार नसल्याची भूमिका घेतली होती. या मुद्द्यावरुन आता पीसीबीचे विद्यमान चेयरमन नजम सेठी यांनी आपली भूमिका मांडली आहे. पाकिस्तान 2023 मध्ये भारतात वर्ल्ड कपसाठी येणार की नाही, याबाबत पाकिस्तान सरकारच ठरवेल असं म्हणालेत.

नजम सेठी काय म्हणाले?

“जर पाकिस्तान सरकारने आम्हाला भारतास जाण्यास नकार दिला तर आम्ही जाणार नाहीत”, सेठी यांनी असं उत्तर रमीज राजाच्या धमकीवरुन दिलं. सेठी कराचीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“एकमेकांविरुद्ध खेळायचं की नाही, तसेच भारत दौरा करायचा की नाही, हे सर्व निर्णय उच्च पातळीवर घेतले जातात. पीसीबी यावर फक्त सरकारकडून स्पष्टता मागू शकते”, असं सेठी यांनी नमूद केलं.

“आशिया कपबाबत आम्ही एशियन क्रिकेट काउन्सिलच्या (Asian Cricket Council) संपर्कात राहू”, असं सेठी यांनी सांगितलं. आशिया कप 2023 चं यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे.

परिस्थिती पाहून आम्ही पुढची पाऊलं उचलू. आम्ही जे निर्णय घेतले त्यात मतभेद होणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ”, असं सेठी यांनी सांगितलं.

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.