टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला उपांत्य फेरीची संधी, आता असं असेल गणित

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीचे सामने सुरू आहेत. या फेरीत गट 1 आणि गट 2 असे विभागणी करण्यात आली होती. गट 2 मध्ये न्यूझीलंडचा पराभव झाल्याने गुणतालिकेत उलटफेर झाला आहे. या गटातील न्यूझीलंडचं सर्व गणित बिघडलं आहे. तर पाकिस्तानला उपांत्य फेरीची संधी आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला उपांत्य फेरीची संधी, आता असं असेल गणित
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला उपांत्य फेरीची संधी, आता असं असेल गणित
Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 27, 2026 | 10:38 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील गट 2 मधील न्यूझीलंड आणि इंग्लंड सामन्यातील निकालामुळे मोठा उलटफेर झाला. या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाला आणि पाकिस्तानला संधी चालून आली आहे. या सामन्यावर तसं पाहिलं तर न्यूझीलंडची पकड होती. पण हा इंग्लंडने सामन्यातील विजय खेचून आणला. इंग्लंडला विजयासाठी 18 चेंडूत 43 धावांची गरज होती. पण 18वं षटक न्यूझीलंडला महागात पडलं. या षटकात 22 धावा आल्या आणि सामना इंग्लंडच्या पारड्यात झुकला. इंग्लंडने हा सामना 4 विकेट आणि 3 चेंडू राखून जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडने 20 षटकात 7 गडी गमवून 159 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान इंग्लंडने 19.3 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरले ते विल जॅक्स आणि रेहान अहमद.. या दोघांनी शेवटच्या तीन षटकात सामन्याचं चित्र पालटलं. इंग्लंडच्या या विजयासह पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा वाढल्या आहे. या निकालामुळे पाकिस्तान श्रीलंका सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.

इंग्लंडने सुपर 8 फेरीतील तीन पैकी 3 सामने जिंकले असून 6 गुणांसह उपांत्य फेरी गाठली आहे. तर श्रीलंकेने 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्याने उपांत्य फेरीपूर्वीच तिकीट कापलं गेलं आहे. आता गट 2 मधून उपांत्य फेरीसाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांना संधी आहे. तसं पाहिलं तर न्यूझीलंड आता काहीच करू शकत नाही. कारण सुपर 8 फेरीतील तिन्ही सामने खेळून झाले आहेत. न्यूझीलंडचे 3 पैकी एका सामन्यात विजय, एका सामन्यात पराभव आणि 1 सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे 3 गुण आणि +1.390 नेट रनरेट आहे. तर पाकिस्तानला यामुळे संधी मिळणार आहे.

पाकिस्तानला उपांत्य फेरीची संधी पण…

पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तर 3 गुण होतील. आता पाकिस्तानने 2 सामन्यापैकी एक सामना गमावला आहे. तर एका सामना ड्रॉ झाला. त्यामुळे 1 गुण आणि नेट रनरेट हा -0.461 आहे. पाकिस्तानला आता विजयासोबत नेट रनरेटचं गणित सोडवणं भाग आहे. यासाठी पाकिस्तानला दोन गणित सोडवणं भाग आहे. पहिल्यांदा फलंदाजी आली तर सामना 65 धावांनी जिंकावा लागेल. पहिल्यांदा गोलंदाजी आली तर दिलेलं टार्गेट 13.2 षटकात पूर्ण करावं लागेल. तर विजयासह नेट रनरेटचं गणित सुटेल.

Follow Us