
आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. भारताचा विजय पाकिस्तानचा मंत्री आणि पीसीबी अध्यक्ष असलेल्या मोहसिन नकवीला काही रूचला नाही. त्यामुळे नकवी मैदानातून ट्रॉफी घेऊन पळून गेला. त्याच्या या कृतीवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. दुसरं कोणी असतं तर ट्रॉफी तिथेच ठेवून पळ काढला असता. पण नकवी पाकिस्तानला साजेसे कृत्य केलं. पाकिस्तान हा देश किती भिकारी आहे याचं दर्शन कृतीतून घडवलं. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष या नात्याने ट्रॉफी भारताला दुसऱ्याच्या हाती सोपवून जाणं भाग होतं. पण नकवीने तसं केलं नाही. उलट ट्रॉफी स्वत:सोबत हॉटेलात घेऊन गेला. त्यानंतर चोरीचा आरोप होईल या भीतीने ट्रॉफी एसीसी कार्यालयात बंदिस्त करून ठेवली आहे. तसेच त्याच्या परवानगीशिवाय काढू नये असे आदेश दिले आहेत. इतकंच काय तर भारताला देऊ नये.
भारतीय संघाने आशिया कप स्पर्धा जिंकल्यानंतर नकवीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानसोबत दुरावाच ठेवला. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा दाखवला. नो हँडशेक आणि पाकिस्तानी मोहसिन नकवीच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दाखवला. मोहसिन नकवी हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आणि गृहमंत्री आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी आधीच स्पष्ट केलं होतं की त्याच्या हातून ट्रॉफी घेणार नाही. इतर कोणाच्याही हातून दिली तर ती आम्ही स्वीकारू असं सांगितलं होतं. पण नालायक मोहसिन नकवीच्या मनात काळंबेरं होतं आणि त्याने मैदानातून ट्रॉफी घेऊन पळ काढला.
नकवीने एका जवळच्या सहकाऱ्याला सांगितलं की, आशिया कप ट्रॉफी फक्त तेच भारतीय संघाला किंवा बीसीसीआयला सोपवतील. दुसरं कोणीही भारताला ट्रॉफी देऊ शकत नाही. नकवीच्या या कृतीमुळे बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे. हा मुद्दा आयसीसी बैठकीत उपस्थित केला जाणार आहे. दुसरीकडे, मोहसिन नकवीची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.