क्रिकेटमधील विचित्र घटना! सामना सुरु असताना फलंदाजाने काढली झोप, पंचांनी थेट घेतला असा निर्णय
पाकिस्तान आणि क्रिकेट यात रोज काही ना काही विचित्र घटना घडत असतात. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाज झोपल्याने चर्चेचा विषय ठरली आहे. लाईव्ह सामन्यात फलंदाज झोपल्याने पंचही हैराण झाले. त्यांनी तात्काल एक निकाल देऊन टाकला.

क्रिकेटच्या मैदानात सामना सुरु असताना खेळाडूची खऱ्या अर्थाने झोप उडालेली असते. मैदानात प्रत्येक चेंडूला गणित बदलत असतं. त्यामुळे फलंदाजीवेळी प्रत्येक खेळाडूला सावध राहणं गरजेचं असतं. पण पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत एक विचित्र प्रकार घडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचा भाग असलेला सऊद शकील फलंदाजीवेळी झोपा काढताना दिसला. इतक्या गाढ झोपेत होता की तो उठलाच नाही. त्यामुळे पंचांनी झोपेत असलेल्या सऊद शकीलला टाइम आऊट दिलं. क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज वेळेत मैदानात उतरला नाही तर तल्या बाद दिलं जातं.सउद शकीलच्या बाबतीत असंच झालं. तो फलंदाजीवेळी झोपा काढत राहिला आणि वेळ संपल्याचं पाहून पंचांनी त्याला बाद घोषित केलं. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेज अँजेलो मॅथ्यूज हेल्मेटची स्ट्रीप तुटल्याने वेळेत मैदानावर पोहोचला नाही. त्यानंतर बांगलादेशने अपील केली आणि त्याला बाद घोषित करण्यात आलं.पीटीव्हीचा कर्णधार अमद बट अपील केला आणि पंचांनी मान्य केले की कसोटी फलंदाज निर्धारित तीन मिनिटांत तयार नव्हता.
आकडेवारीनुसार, फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये फलंदाज अशा पद्धतीने झोपण्याची ही सातवी वेळ आहे. त्यामुळे त्यांना टाइम आऊट दिलं गेलं आहे. खरं तर काही वेळा अशा असतात की त्यामुळे डोळा लागतो. पाकिस्तानच्या खेळाडूचही असंच काहीसं झालं असावं, अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. पाकिस्तानात देशांतर्गत प्रेसिडेंट कपच्या ग्रेड 1 सामने सुरु आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात प्रेसिडेंट्स ट्रॉफीने त्याच्या अनोख्या वेळापत्रकामुळे चर्चेत आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करणाऱ्या मुस्लिम खेळाडूंना सामावून घेण्यासाठी रात्रभर सामने खेळवले जात आहेत. सामने संध्याकाळी 7.30 ते पहाटे 2.30 पर्यंत नियोजित केले आहेत.
स्टेट बँक ऑफ पाकिस्तान आणि पाकिस्तान टेलिव्हिजन यांच्यात हा सामना सुरु होता. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानची बॅटिंग सुरु होती. या सामन्याचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. सऊद शकील याच संघाकडून खेळत होता. पण झोपी गेल्याने विकेट गमवावी लागली. त्याला एक चेंडू काय मैदानात उतरण्याची संधीही मिळाली नाही.
