Under 19 World Cup 2026: इंग्लंडच्या फलंजादाने गोलंदाजांना फोडून काढला, 26 चौकार-षटकार मारले
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड आणि स्कॉटलंड हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात इंग्लंडच्या बेन मायसचं वादळ घोंघावलं. त्याने 117 चेंडूत 191 धावांची खेळी केली.

अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेत काही विक्रम नव्याने रचले गेले, तर काही विक्रम मोडले गेले. या स्पर्धेत युवा खेळाडूंकडून आक्रमक खेळीचं दर्शन घडत आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. इंग्लंड आणि स्कॉटलंड हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकात 404 धावा केल्या. तसेच विजयासाठी 405 धावांचं आव्हान ठेवलं. या धावसंख्येत मोलाचा हातभार लागला तो बेन मायसचा.. त्याने 117 चेंडूत 191 धावांची खेळी केली. या खेळीत बेन मायसने 8 षटकार आणि 18 चौकार मारले. द्विशतकासाठी फक्त 9 धावांची गरज असताना मॅक्स चॅपलिनच्या गोलंदाजीवर थॉमस नाइटच्या हाती झेल गेला आणि संपला. यासह अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बेन मायस इंग्लंडसाठी सर्वात वेगाने शतक ठोकणारा फलंदाज ठरला.
उजव्या हाताच्या फलंदाजाने फक्त 65 चेंडूत शतक ठोकलं. इतकंच अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. बेन मायस हा इंग्लंडचं भविष्य असल्याचं मानलं जात आहे. बेन हा वयाच्या 14व्या वर्षापासून हँपसरसाठी क्रिकेट खेळत आहे. टॉटन आणि एलिंग क्रिकेट क्लबसाठीही खेळला आहे. मागच्या जुलै महिन्यात त्याला पहिलं प्रोफेशनल करार मिळाला होता. हँपशरने त्याला 2027 पर्यंत करारबद्ध केलं आहे. बेनने आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशत ठोकलं होतं. त्याने 55 चेंडूत 74 धावा काढल्या होत्या. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कमाल करत आहे.
बेन मायसने अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळलेल्या तीन सामन्यात एकूण 288 धावा केल्या आहेत. यावरून त्याचा फॉर्म काय ते दिसून येत आहे. यात एक शतक आणि दोन अर्धशतकं ठोकली आहे. या स्पर्धेत त्याने एकूण 12 षटकार मारले असून त्याचा स्ट्राईक रेट हा 100 पेक्षा जास्त आहे. बेन मायस म्हणाला की, ‘एक संघ म्हणून आम्ही सर्वोत्तम धावा कुठे करू शकतो हे ओळखण्याचा प्रयत्न केला आहे, गोलंदाजांना लक्ष्य करू शकतो. मला वाटतं आज संपूर्ण संघाने ते चांगले केले, फक्त मीच नाही. जोरदार वारा, लहान चौकार. मला वाटतं की आम्ही त्याचा फायदा आमच्या फायद्यासाठी घेतला. ते उत्तम आहे.’
