
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचं मनोबल चांगलंच वाढलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका 2-0 ने जिंकली. सलग दोन विजयानंतर ऑस्ट्रेलियाने मालिका गमावली आहे. तर तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. पाकिस्तानने दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने 20 षटकात 5 गडी गमवून 198 धावा केल्या. तसेच विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना ऑस्ट्रेलियाचा संघ 15.4 षटकात सर्व गडी गमवून 108 धावांवर तंबूत परतला. हा सामना पाकिस्तानने 90 धावांनी जिंकला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानने शर्यतीत असल्याचं दाखवून दिलं आहे. पाकिस्तानचा संघ भारताच्या गटात आहे. तसेच 15 फेब्रुवारीला आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे कमी लेखनं महागात पडू शकते.
पाकिस्तानकडून कर्णधार सलमान आघा आणि उस्मान खान यांनाी चागली फलंदाजी केली. बाबर आझम या सामन्यात पुन्हा एकदा फेल गेला. त्याने 5 चेंडूत फक्त 2 धावा केल्या. तर साहिबजादा फरहानने 5 आणि सैम आयुब 23 धावा करून तंबूत परतले. सलमान आघाने 40 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार मारत 76 धावांची खेली केली. तर उस्मान खानने 36 चेंडूत 53 धावा केल्या. शादाब खान नाबाद 28 आणि मोहम्मद नवाज नाबाद 9 धावांवर राहिले. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. कमरून ग्रीनने 35 आणि मॅथ्यू शॉर्टने 27 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. पाकिस्तानकडून अबरार अहमदने 3, शादाब खानने 3, उस्मान तारिकने 2, सैम आयुबने 1 आणि मोहम्मद नवाजने 1 विकेट घेतला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श म्हणाला की, पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तानने आम्हाला हरवले. त्यामुळे, उद्या आम्ही परिस्थिती बदलू शकू अशी आशा आहे. ही मालिका या सामन्याआधी जिवंत होती. मी म्हटल्याप्रमाणे, पाकिस्तानने आम्हाला नक्कीच हरवले. जेव्हा तुम्ही हरता तेव्हा त्यातून नेहमीच चांगले धडे घेता येतात. आशा आहे की आम्ही उद्या ते अंमलात आणू आणि पुढे जाऊ शकू. त्यांनी पॉवरप्लेमध्ये आमच्यावर खूप दबाव आणला. कदाचित तो 160-170 ची विकेट होती. आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत ज्यांना माहित आहे की अशा धावांचा पाठलाग करताना भागीदारी खरोखर महत्वाची असते. आज आम्ही ते करू शकलो नाही. म्हणून, मी म्हटल्याप्रमाणे, काही खरोखर चांगले धडे आहेत.