Irfan Pathan Vs Amit Mishra: इरफान पठाणचे अमित मिश्राला उत्तर! संविधानाच्या प्रस्तावनेचे फोटो केला ट्विट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket team) इरफान पठाण आणि अमित मिश्रा या दोन माजी खेळाडूंमध्ये सध्या जोराचा वाद सुरू आहे. या दोघांच्यात वाद विकोपाला गेला आहे की त्याचे पडसाद सोशल मीडियावर ही दिसत आहेत. आता या दोघांचा वाद सोशल मीडियावर सुरू झाला आहे. माजी अष्टपैलू खेळाडू आणि सध्या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत असलेल्या इरफान […]

Irfan Pathan Vs Amit Mishra: इरफान पठाणचे अमित मिश्राला उत्तर! संविधानाच्या प्रस्तावनेचे फोटो केला ट्विट
इरफान पठाण
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 23, 2022 | 8:22 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket team) इरफान पठाण आणि अमित मिश्रा या दोन माजी खेळाडूंमध्ये सध्या जोराचा वाद सुरू आहे. या दोघांच्यात वाद विकोपाला गेला आहे की त्याचे पडसाद सोशल मीडियावर ही दिसत आहेत. आता या दोघांचा वाद सोशल मीडियावर सुरू झाला आहे. माजी अष्टपैलू खेळाडू आणि सध्या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत असलेल्या इरफान पठाणने (Irfan Pathan) शनिवारी एक ट्विट केले. ज्यामध्ये त्याने संविधानाच्या प्रस्तावनेचे छायाचित्र शेअर केले. यापूर्वी इरफान पठाणच्या ट्विटवरून निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर अमित मिश्राने (Amit Mishra) दिलेल्या उत्तराला त्याच्याशी जोडले जात आहे. माजी अष्टपैलू इरफान पठाणने राज्यघटनेची प्रस्तावना ट्विट करताना लिहिले की, मी नेहमीच संविधानाचे पालन केले आहे. तसेच इरफानने नागरिकांनाही याच मार्गावर चालण्याचे आवाहन केले. तसेच इरफानने संविधान कृपया वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचा असेही म्हटले आहे.

ट्विट चर्चेचा विषय

इरफानने हे ट्विट 22 एप्रिल रोजी केले होते. ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, माझा देश, माझा सुंदर देश जगातील सर्वोत्तम देश बनण्याची क्षमता आहे. परंतु… यानंतर मात्र हे ट्विट चर्चेचा विषय बनला आहे. यानंतर अमित मिश्राने यावर ट्विटने प्रतिसाद दिला आणि या प्रकरणाला अधिक महत्त्व मिळाले. अमित मिश्रा यांने ट्विट केले की, माझा देश, माझ्या सुंदर देशामध्ये जगातील सर्वोत्तम देश बनण्याची क्षमता आहे. हे तेव्हाच घडेल जेव्हा काही लोक समजतील की संविधान हा पहिला ग्रंथ आहे, ज्याचे पालन केले पाहिजे.

जातीयवादावर जोरदार चर्चा

लक्षात घेण्यासारखे आहे की इरफान पठाणचे हे ट्विट अशा वेळी आले आहे जेव्हा देशाच्या विविध भागात जातीयवादावर जोरदार चर्चा सुरू आहे. याआधीही इरफान पठाण अनेक मुद्द्यांवर ट्विट करत आला आहे. जे चर्चेत आले आहेत. इरफान पठाण सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये हिंदी कॉमेंट्री करत असून ट्विटरवर तो सतत सक्रिय असतो. दुसरीकडे, अमित मिश्राविषयी बोलायचे झाले तर, तो अद्याप आयपीएलचा भाग नाही, परंतु या हंगामात त्याचे ट्विट सतत चर्चेत असतात आणि तो सामना आणि खेळाडूंबद्दल सतत आपले मत देत असतो.

 

इतर बातम्या :

IPL 2022 : धोनीच्या त्या 5 मॅचविनरला टीममध्ये आणण्यासठी कोट्यवधी लावणार चेन्नई सुपर किंग्जची टीम

Cricket :जसप्रीत बुमराहची टेस्ट रँकिंगमध्ये घसरण, शाहीन आफरीदीची टॉप 5 पर्यंत मजल

IPL 2022 : विराट कोहलीच्या जागी हा खेळाडू होणार आरसीबी टीमचा नवा कॅप्टन