PBKS vs DC Sarfraz Khan: आधी नडला, मग OUT झाला, पण मुंबईच्या मुलाने पंजाबच्या गोलंदाजांना धुतलं, पहा VIDEO

PBKS vs DC Sarfraz Khan: सर्फराज खानने तर आज आपल्या बॅटची ताकत दाखवून दिली. त्याने पंजाबच्या गोलंदाजांना धुतलं. तो मोठी खेळी करु शकला नाही.

PBKS vs DC Sarfraz Khan: आधी नडला, मग OUT झाला, पण मुंबईच्या मुलाने पंजाबच्या गोलंदाजांना धुतलं, पहा VIDEO
Arshdeep Singh-Sarfraz KhanImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 8:55 PM

मुंबई: नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्समध्ये (DC vs PBKS) IPL 2022 मधला 64 वा सामना सुरु आहे. पंजाबचा कॅप्टन मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅप्टनचा हा निर्णय लियाम लिव्हिंगस्टोनने योग्य सुद्धा ठरवला. पहिलीच ओव्हर टाकणाऱ्या लिव्हिंगस्टोनच्या गोलंदाजीवर दिल्लीचा आक्रमक सलामीवीर डेविड वॉर्नर आऊट झाला. वॉर्नरला आज भोपळाही फोडता आला नाही. त्याने राहुल चाहरकडे सोपा झेल दिला. त्यानंतर सर्फराज खान (Sarfraz Khan) आणि मिचेल मार्शची जोडी मैदानावर होती. पहिली विकेट शुन्यावर गेल्यामुळे पंजाबच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढला होता. पण मार्श आणि सर्फराझने पंजाबच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. त्यांनी प्रतिहल्ला चढवला.

असा स्कूपचा फटका आणि त्यावर चौकार तुम्ही बघितला नसेल, एकदा इथे क्लिक करुन बघा

सर्फराजने वेगळाच स्कूपचा फटका दाखवला

सर्फराज खानने तर आज आपल्या बॅटची ताकत दाखवून दिली. त्याने पंजाबच्या गोलंदाजांना धुतलं. तो मोठी खेळी करु शकला नाही. पण 16 चेंडूतील छोट्या खेळीतही त्याने आपला प्रभाव पाडला. सर्फराजने 32 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार आहे. ऋषी धवनच्या गोलंदाजीवर तर सर्फराजने वेगळाच स्कूपचा फटका दाखवला. हरप्रीतच्या गोलंदाजीवरही त्याने धावा लुटल्या. त्याने चौफेर फटकेबाजीचं प्रदर्शन केलं.

अर्शदीप आणि सर्फराजमध्ये शाब्दीक बाचाबाची

SIX, 4.4, क्लिक करुन पहा हरप्रीतची सर्फराजने कशी केली धुलाई

पंजाबचा कॅप्टन मयंक अग्रवालने अर्शदीप सिंगच्या हातात चेंडू सोपवला. त्याने अर्शदीपच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. तिसऱ्या चेंडूवर राहुल चाहरला एक कठीण झेल पकडता आला नाही. त्या चेंडूनंतर अर्शदीप आणि सर्फराजमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. पुढच्याच चेंडूवर सर्फराज खानने अर्शदीपच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू स्लोअर वन होता. सर्फराजला बॉल टाइम करता आला नाही. राहुल चाहरने झेल घेतला. सर्फराज खान मुळचा मुंबईचा आहे. आयपीएलआधी रणजी सामन्यातही त्याने दमदार कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये संधी मिळाल्यानंतर आज सर्फराजने आपलं कौशल्य दाखवलं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.