AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs MI : कॅप्टन हार्दिकला पराभवाचा धक्का असह्य, मैदानात रडला! रोहितचाही चेहरा पडला, पाहा

Hardik Pandya Emotional : कर्णधार हार्दिक पंड्या याने मुंबई इंडियन्सला आयपीएल 2025 मध्ये क्वालिफायर-2 पर्यंत आणलं. मात्र हार्दिक मुंबईला अंतिम फेरीत पोहचवण्यात अपयशी ठरला. मुंबईच्या पराभवामुळे हार्दिकला अश्रू अनावर झाले.

PBKS vs MI : कॅप्टन हार्दिकला पराभवाचा धक्का असह्य, मैदानात रडला! रोहितचाही चेहरा पडला, पाहा
Hardik Pandya and Rohit Sharma EmotionalImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 02, 2025 | 2:51 AM
Share

मुंबई इंडियन्सचं आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत पोहचण्याचं स्वप्न नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भंग झालं आहे. पंजाबने मुंबईवर क्वालिफायर -2 सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवून फायनलचं तिकीट मिळवलं आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने केलेल्या तोडफोड खेळीच्या जोरावर पंजाबने दणदणीत विजय मिळवला. पंजाबने 204 धावांचं आव्हान 6 बॉल राखून 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. श्रेयसने या सामन्यात कर्णधार म्हणून अप्रतिम खेळी केली. श्रेयसने नाबाद 87 धावा केल्या. पंजाबची 2014 नंतर फायनलमध्ये पोहचण्याची ही पहिली वेळ ठरली. तर मुंबई 204 धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरली. मुंबईच्या पराभवाचा धक्का कर्णधार हार्दिकला असह्य झाला. त्यामुळे हार्दिक मैदानात भावूक झाला. आपल्या नेतृत्वात मुंबईला अंतिम फेरीत पोहचवू न शकल्याचं शल्य त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तर दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा याचाही चेहरा पडला.

हार्दिकला अश्रू अनावर!

पंजाब किंग्स टीमने सामना जिंकताच कॅप्टन हार्दिक मैदानात बसला. हार्दिक पराभवामुळे उदास झाला. हार्दिक पराभवामुळे नाखूश दिसत होता. तर मुंबईच्या गोटातही निराशेचं वातावरण होतं. आपण जिंकू शकलो नाहीत, याचं दु:ख खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. तसेच मुंबई इंडियन्सच्या मालकीण निता अंबानी या देखील हताश दिसल्या.

मुंबईचं कुठे चुकलं?

मुंबईच्या फलंदाजांनी ठिकठाक धाव्या केल्या. मुंबईच्या फलंदाजांनी 203 रन्स केल्या. मुंबईने या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या डावात जेव्हा जेव्हा 200 पेक्षा अधिक धावा केल्या तेव्हा तेव्हा विजय मिळवला. त्यामुळे मुंबई हा सामनाही जिंकेल, अशी आशा पलटणच्या चाहत्यांना होती. मात्र मुंबईचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. तसेच गोलंदाजांना फिल्डिंगमधूनही अपेक्षित साथ मिळाली नाही. ट्रेंट बोल्ट याने निर्णायक क्षणी नेहल वढेरा याची सोपी कॅच सोडली. मुंबईने मोठी संधी गमावली. बोल्टने कॅच सोडणं हा टर्निंग पॉइंट ठरला.

हार्दिक पराभवानंतर भावूक

दुसरी आणि सर्वात मोठी बाब म्हणजे जसप्रीत बुमराह अपयशी ठरला. बुमराहने आतापर्यंत मुंबईने अनेक सामन्यांमध्ये एकहाती विजय मिळवून दिला आहे. मात्र या सामन्यात बुमराहला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दुर्देवाने बुमराहला एकही विकेट मिळवता आली नाही. बुमराहचा फॉर्म नसणं पंजाबच्या पथ्यावर पडलं. पंजाबने याचा फायदा घेतला आणि इतर गोलंदाजांची धुलाई करत त्यांच्यावर दबाव तयार केला. पंजाबने अशापक्रारे मुंबईवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली. आता पंजाब अंतिम फेरीत 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध भिडणार आहे. हा अंतिम सामना अहमदाबमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच होणार आहे.

नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.