PBKS vs MI Toss : पंजाबने टॉस जिंकला, मुंबई विरुद्ध फिल्डिंग, युझवेंद्र चहलचं कमबॅक

Punjab Kings vs Mumbai Indians Qualifier 2 Toss And Playing 11 : आयपीएल 2025 मधील दुसऱ्या सेमी फायनल सामन्याचं आयोजन हे जगातील सर्वात मोठ्या अर्थात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

PBKS vs MI Toss : पंजाबने टॉस जिंकला, मुंबई विरुद्ध फिल्डिंग, युझवेंद्र चहलचं कमबॅक
PBKS vs MI Qualifier 2 Toss Ipl 2025
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 01, 2025 | 7:29 PM

आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्सवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता? या प्रश्नाचं उत्तर हे आज 1 जून रोजी मिळणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्वालिफायर 2 सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. मुंबईने एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सवर मात करत क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केलाय. तर साखळी फेरीत टॉप 2 मध्ये राहिल्याने पंजाबला क्वालिफायर-1 मधील पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. पंजाबच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार श्रेयसने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल

पंजाब आणि मुंबई दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1-1 बदल केला आहे. पंजाबमध्ये मॅचविनर फिरकीपटू युझवेंद्र चहल याचं कमबॅक झालं आहे. चहलला दुखापतीमुळे गेल्या 3 सामन्यांना मुकावं लागलं होतं. मात्र आता चहलच्या कमबॅकमुळे पंजाबची ताकद वाढली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईने रिचर्ड ग्लीसन फिट नसल्याने त्याच्या जागी रिस टॉपली याचा समावेश केला आहे.

अहमदाबादमधील आठवा सामना

आयपीएलच्या 18 व्या मोसमात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामन्याचं आयोजन करण्याची ही आठवी वेळ आहे. याआधी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 7 सामने झाले आहेत. या 7 सामन्यांमध्ये टॉस जिंकून बॅटिंग करणारी टीम 6 वेळा जिंकली आहे. तर विजयी धावांचा पाठलाग करताना एकदाच विजयी होता आलं आहे. तसेच या स्टेडियममधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ही 221 आहे. त्यामुळे या सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने

दरम्यान पंजाब आणि मुंबई दोन्ही संघांची 18 व्या मोसमात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत आमनेसामने होते. पंजाबने 26 मे रोजी मुंबईवर विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबई या पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पंजाबच्या गोलंदाजांसमोर पलटणच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कॅप्टन), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अझमतुल्लाह ओमरझईअझमतुल्लाह, कायल जेमिसन, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि रीस टोपली.