AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs MI : मुंबई की पंजाब, दोघांपैकी वरचढ कोण? जाणून घ्या

Punjab Kings VS Mumbai Indians Head To Head : आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रवेश मिळवला आहे. तर फायनलमध्ये पोहचणारी दुसरी टीम 1 जूनला निश्चित होणार आहे. या एका जागेसाठी पंजाब आणि मुंबईमध्ये चुरस असणार आहे.

PBKS vs MI : मुंबई की पंजाब, दोघांपैकी वरचढ कोण? जाणून घ्या
Shreyas Iyer And Rohit Sharma Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 31, 2025 | 11:27 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. पंजाब विरुद्ध मुंबई 1 जून रोजी आमनेसामने असणार आहेत. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल. हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबईचं नेतृत्व आहे. तर श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा आहे. या सामन्यानिमित्ताने उभयसंघात कोण वरचढ आहे? तसेच खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

दोन्ही संघ तुल्यबळ

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 33 वेळा आमनेसामने आले आहेत. एका सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मुंबई इंडियन्स 33 पैकी सर्वाधिक 17 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पंजाब किंग्सने मुंबईवर 16 वेळा पलटवार केला आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

दोन्ही संघ 18 व्या मोसमातील साखळी फेरीत एकदाच आमनेसामने आले होते. पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यात 26 मे रोजी सामना झाला होता. तेव्हा पंजाबने मुंबईवर मात केली होती. त्यामुळे पलटण क्वालिफायर-2 सामन्यात पंजाबचा धुव्वा उडवत साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

पीच रिपोर्ट

नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे इथे हायस्कोअरिंग सामना होण्याची शक्यता आहे. तसेच सामन्यात स्पिनरला मदत मिळू शकते. टॉस जिंकणारा संघ बॉलिंगचा निर्णय घेऊ शकते. कारण इथे विजयी धावांचं आव्हान करणं सोपं ठरु शकतं. या मैदानात 200 पेक्षा अधिक स्कोअर केल्यास दोन्ही संघात जोरदार चुरस पाहायला मिळू शकते. आतापर्यंत या स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेतील एकूण 41 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 20 सामने पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर 21 वेळा दुसर्‍या डावात बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे.

पंजाबची अहमदाबादमधील कामगिरी

पंजाब किंग्सने या स्टेडियममध्ये आतापर्यंत 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर 2 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. पंजाबने या मैदानात 2 वेळा विजयी धावांचा पाठलाग यश मिळवलं आहे. तर 1 वेळा पहिल्या डावात बॅटिंग केल्यानंतर विजय मिळवला आहे.

तर दुसऱ्या बाजूला मुंबईची या स्टेडियममधील आकडेवारी चिंताजनक आहे. मुंबईने या स्टेडियमधील 5 पैकी 4 सामने गमावले आहेत. तर एकदाच विजय मिळवता आला आहे. मुंबईने हा एकमेव विजय पहिल्या डावात बॅटिंग केल्यानंतर मिळवला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.