
आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडणार आहे. हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. कारण आतापर्यंत तुम्ही या स्पर्धेत काय केलं? यापेक्षा जेतेपद कोण मिळवतं? याकडे लक्ष असणार आहे. भारताने पाकिस्तानला या स्पर्धेत दोनदा धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर आहे. तर भारत पाकिस्तानला तिसऱ्यांदा पराभूत करून जेतेपदावर नाव कोरण्यास सज्ज आहे. असं असताना पाकिस्तानला वारंवार मिरच्या झोंबत असल्याचं दिसत आहे. नो हँडशेक प्रकरण असो की आणखी काही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तक्रारींचा पाढा वाच आहे. असं असताना अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांची आयसीसीकडे तक्रार केली आहे. भारतीय गोलंदाजाने अश्लील हावभाव केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता पीसीबीच्या आरोपात किती तथ्य आहे हे आयसीसीच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल. यापूर्वी पीसीबीने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवची तक्रार केली होती.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मते, 21 सप्टेंबरला भारत पाकिस्तान यांच्यात सुपर 4 फेरीचा सामना झाला. या सामन्यात अर्शदीप सिंगने प्रेक्षकांकडे पाहून अश्लील हावभाव केले होते. पीसीसीच्या मते अर्शदीपने असं वागत आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. भारतीय वेगवान गोलंदाजाचा कृती बेजबाबदार आणि खेळात व्यत्यय आणणारी होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता अर्शदीप सिंगवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. बीसीसीआयने हारिस रऊफच्या संतापजनक हावभावानंतर आयसीसीकडे तक्रार केली होती. तेव्हा त्याच्या सामना फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर अर्शदीप सिंगचा एक सिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर पीसीबीने आक्षेप घेतला आहे.
दुसरीकडे, अर्शदीप सिंग याच्यापूर्वी पीसीबीने सूर्यकुमार यादवविरुद्धही तक्रार दाखल केली होती.आयसीसीने सूर्यकुमार यादववर कारवाई केली. तसेच त्याच्या सामना फीच्या 30 टक्के दंड ठोठावला. पण बीसीसीआयने आयसीसीच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे. दरम्यान, अंतिम सामन्यातही खेळाडूंची आक्रमकता पाहायला मिळणार यात काही शंका नाही. दोन्ही संघासाठी जेतेपद हे खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे खेळाडूंवर दबाव असणार यात काही शंका नाही.