AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK Final : झेंडा स्टेडियममध्ये फडकवता येणार नाही, भारत पाकिस्तानने तसं केलं तर…! जाणून घ्या नियम

आशिया कप २०२५ स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना पाहण्यासाठी मैदानात जाणार असाल तर काही नियम असणार आहे. अन्यथा मोठा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे स्टेडियममध्ये जाण्यापूर्वी हे नियम नक्की जाणून घ्या.

IND vs PAK Final : झेंडा स्टेडियममध्ये फडकवता येणार नाही, भारत पाकिस्तानने तसं केलं तर...! जाणून घ्या नियम
IND vs PAK Final : झेंडा स्टेडियममध्ये फडकवता येणार नाही, भारत पाकिस्तानने तसं केलं तर...! जाणून घ्या नियम Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 28, 2025 | 2:41 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला आशिया कप स्पर्धेचा शेवटचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत तिसऱ्यांदा दोन्ही संघ भिडणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोनदा सामना झाला होता. हे दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. आता तिसऱ्यांदा तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान हे संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत. ४१ वर्षानंतर हे दोन संघ भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. दुसरीकडे, दोन्ही देशातील तणावपूर्ण संबंध पाहत या सामन्याला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. दुबई पोलिसांना यासाठी विशेष नियमावली आखली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मैदानात सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी काय करावं आणि काय नको याबाबत सूचना दिल्या आहेत. इतकंच काय तर सामना सुरु होण्याच्या तीन तास आधीच मैदानात येण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नियमानुसार, एका तिकीटावर एका व्यक्तीला एकदाच प्रवेश दिला जाईल. म्हणजेच त्या तिकीटावर पुन्हा मैदानात जाण्याचा प्रयत्न केला तर बाहेरच राहावं लागेल. एखाद्या व्यक्तीने मैदानात प्रवेश केल्यानंतर काही कामासाठी बाहेर गेला तर त्याला परत मैदानात येता येणार नाही. इतकंच काय तर मैदानात पोहोचल्यानंतर नियमांचं पालन करावं लागणार आहे. यात भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना मैदानात झेंडे घेऊन जाता येणार नाही. इतकंच काय तर बॅनर आणि फटाखेही नेण्यास मनाई आहे. त्याचबरोबर मैदानात धावत जाणे, प्रतिबंधित वस्तू नेणे, तसेच अपशब्दांचा वापर केल्यास कठोर कारवाई केली जाईल. असं केल्यास १.२ लाख ते ७.२४ लाखांचा दंड ठोठावला जाईल. तसेच तीन महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागेल.

भारतीय संघ या सामन्यात नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी चीफ गेस्टकडून ट्रॉफीही स्वीकारणार नाही असं सांगितलं जात आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात बराच वाद पाहायला मिळणार आहे. भारताने साखळी आणि सुपर ४ फेरीत आपला पवित्रा कायम ठेवला होता. अंतिम फेरीतही त्यात काही बदल होणार नाही. दरम्यान, भारतीय संघ नवव्या आशिया कप विजयासाठी सज्ज आहे. भारताने आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा जेतेपद मिळवलं आहे. तसेच या स्पर्धेत भारताचं पारडं आहे. त्यामुळे जेतेपदासाठी भारतीय संघाला पसंती दिली जात आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.