AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 LSG vs GT Live Streaming: लखनौसमोर गुजरातला सलग पाचवा विजय मिळवण्यापासून रोखण्याचं आव्हान

Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Streaming: शनिवारी 12 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. या दोघांपैकी कोण कुणाची विजयी घोडदौड रोखणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

IPL 2025 LSG vs GT Live Streaming: लखनौसमोर गुजरातला सलग पाचवा विजय मिळवण्यापासून रोखण्याचं आव्हान
LSG vs GT IPL 2025 Preview And Live StreamingImage Credit source: IPL/BCCI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 11, 2025 | 11:53 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 26 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. लखनौ आणि गुजरात या दोन्ही संघांचा हा या मोसमातील सहावा सामना असणार आहे. शुबमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे लखनौच्या कर्णधारपदाची धुरा आहे. गुजरातची या हंगामात पराभवाने सुरुवात झाली. मात्र त्यानंतर गुजरातने सलग 4 विजय मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनौने गेल्या 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तसेच लखनौने गेली दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे लखनौला गुजरातवर मात करत विजयी हॅटट्रिकची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरात विजयी पंचसाठी सज्ज आहे. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकतं? याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

लखनौ विरुद्ध गुजरात सामना केव्हा?

लखनौ विरुद्ध गुजरात सामना शनिवारी 12 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

लखनौ विरुद्ध गुजरात सामना कुठे?

लखनौ विरुद्ध गुजरात सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे आयोजित करण्यात आला आहे.

लखनौ विरुद्ध गुजरात सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

लखनौ विरुद्ध गुजरात सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

लखनौ विरुद्ध गुजरात सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

लखनौ विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहत येईल.

लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, राजवर्धन हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.

गुजरात टायटन्स टीम: साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, शेरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स, इशांत शर्मा, अनुज रावत, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरोर, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, करीम जनात, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा आणि गुरनूर ब्रार.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा