
मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघामध्ये सामना होत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन येथे आयपीएलच्या 42 व्या सामन्यात पंजाब लखनौ सुपर जायंट्सशी भिडणार असून पंजाबने टॉस जिंकलाय. तर लखनौचा संघ फलंदाजी करत आहे. पंजाबच्या नजरा फॉर्मात असलेला कर्णधार केएल राहुलवर असणार आहे. लखनौचा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. संघाने पाच सामने जिंकले आहेत, तर तीन पराभवाचा सामना केलाय. पंजाब संघाने आठ सामन्यांत चार विजय आणि तितक्यात सामन्यात पराभवाचा सामना केलाय. सुपर जायंट्सने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभूत केलं होतं. तर पंजाब किंग्ज संघ चेन्नई सुपर किंग्जचा 11 धावांनी पराभव केला होता. पंजाबसमोर विजयाची घोडदौड कायम राखण्याचं लखनौचं मोठं आव्हान असणार आहे.
टॉसदरम्यान काय म्हणाला केएल राहुल, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाब किंग्ज: मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, भानुका राजपक्षे, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग.
सामन्यापूर्वी काय म्हणाला राहूल चहर, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Stop the press! We win the toss after 1 month, opt to chase! ☺️#SherSquad, we are unchanged! #SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #PBKSvLSG #ਸਾਡਾਪੰਜਾਬ pic.twitter.com/iYNyJWp4FG
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 29, 2022
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, क्रुणाल पांड्या, दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमिरा, रवी बिश्नोई, मोहसिन खान.
Pesh hai aaj ke dumdaar yoddha! ?#IPL2022 ? #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL pic.twitter.com/DuzRQCZSNP
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 29, 2022
लखनौ संघाला आशा आहे की इतर फलंदाज कर्णधार राहुलला चांगली साथ देतील. ज्यात त्याचा सलामीचा जोडीदार क्विंटन डी कॉक आहे. डी कॉक मुंबईविरुद्ध केवळ 10 धावा करू शकला. डी कॉकने आतापर्यंत 225 धावा केल्या आहेत पण तो त्याच्या क्षमतेला न्याय देऊ शकला नाही. लखनौची फलंदाजी अधिक चांगली कामगिरी करताना मजबूत करावी लागेल. अनुभवी मनीष पांडे, आक्रमक फलंदाज मार्कस स्टॉइनिस आणि कृणाल पांड्या, भरवशाचा दीपक हुडा आणि युवा आयुष बडोनी याशिवाय वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डरच्या उपस्थितीत लखनौच्या फलंदाजीत खोलवर आहे. संघाच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे. श्रीलंकेचे वेगवान गोलंदाज दुष्मंथा आणि होल्डरने प्रभावित केले आहे. या दोघांनी मिळून आतापर्यंत 14 बळी घेतले असून त्यांना पंजाबविरुद्धही ही कामगिरी कायम ठेवावी लागणार आहे.
सामन्यापूर्वी काय म्हणाला दीपक हुड्डा, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा