AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुला विकेट घ्यायची गरज नाही पण…, मोहम्मद सिराजची गोलंदाजी पाहून आर अश्विन भडकला

भारताने पहिल्या डावात जबरदस्त फलंदाजी केली होती. असं वाटत होतं की हा सामना भारत सहज जिंकेल. पण टीम इंडियाची सुमार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे हा सामना गमावला. खासकरून या सामन्यात मोहम्मद सिराजमुळे सर्व सूर ताल बिघडला. यावरून आता आर अश्विनही भडकला आहे.

तुला विकेट घ्यायची गरज नाही पण..., मोहम्मद सिराजची गोलंदाजी पाहून आर अश्विन भडकला
तुला विकेट घ्यायची गरज नाही पण..., मोहम्मद सिराजची गोलंदाजी पाहून आर अश्विन भडकलाImage Credit source: PTI
| Updated on: Jun 27, 2025 | 7:42 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पहिला सामना मोठी धावसंख्या करूनही गमवण्याची वेळ आली. यामुळे मालिकेत टीम इंडियाचं काही खरं नाही अशीच भावना क्रीडाप्रेमींमध्ये तयार झाली आहे. भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावाता 364 धावा केल्या. मात्र इतक्या धावा करूनही गोलंदाजांना काही इंग्लंडला रोखण्यात यश आलं नाही. एकीकडे जसप्रीत बुमराह मेहनत करत होता. मात्र त्याला काही साथ मिळाली नाही. खरं तर मोहम्मद सिराज पूर्णपणे फेल गेल्याचं दिसलं. पूर्ण सामन्यात त्याच्या गोलंदाजीची धार बोथट झाली होती. विकेट मिळाल्या पण धावा देत सुटला. त्याच्या गोलंदाजीतील सूर गेल्याचं दिसून आलं. आता माजी क्रिकेटपटू आर अश्विनने मोहम्मद सिराजवर टीकास्त्र सोडलं आहे. आर अश्विनने त्याची गोलंदाजी पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचं मत त्याने स्वत:च्या युट्यूब चॅनेलवर व्यक्त केलं आहे.

आर अश्विनने युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, माझा एकच प्रश्न आहे. तू धाव गती रोखू शकतो का? तुला विकेट घेण्याची गरज नाही. पण तू प्रत्येक षटकात 4-5 धावा देऊ शकणार नाहीस का? जर धावा जात असतील तर बुमराहला परत गोलंदाजीला आणावं लागतं. बुमराह किती बांध बांधेल? सलग गोलंदाजी करून थकून जातो आणि स्पेल वाढतो. तिथपर्यंत भागीदारी होऊन जाते. एक तर तुम्हाला जडेजासोबत जावं लागेल. त्याला पुढे येऊन धावगती थांबवावी लागेल. प्रसिद्ध पहिल्यांदा खेळत आहे आणि त्याच्याकडे अनुभव नाही. यासाठी सिराजला विश्वासपूर्वक भूमिका बजवावी लागेल. मोर्ने मोर्केल 20 षटकात कशी गोलंदाजी करायचा? अशी भूमिका असली पाहीजे.

मोहम्मद सिराजने पहिल्या डावात 27 षटकं टाकली होती. त्यात 4.51 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या. दोन विकेट मिळाल्या पण तिथपर्यंत इंग्लंडचं टेन्शन रिलीज झालं होतं. दुसऱ्या डावात तर त्याला एकही विकेट मिळाली नाही. 14 षटकात 51 धावा दिल्या. खरं सांगायचं तर पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह सोडला तर एकही गोलंदाज प्रभावी ठरला नाही. प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकुरही महागडे गोलंदाज ठरले.

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय