Asia Cup 2025 : भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी आर अश्विनचा संताप, सरळ म्हणाला की टीम इंडियाची चूक

आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू आर अश्विनने टीम इंडियाला आरसा दाखवला आहे.

Asia Cup 2025 : भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी आर अश्विनचा संताप, सरळ म्हणाला की टीम इंडियाची चूक
Asia Cup 2025 : भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी आर अश्विनचा संताप, सरळ म्हणाला की टीम इंडियाची चूक
Image Credit source: TV9 Network/File
| Updated on: Sep 14, 2025 | 4:40 PM

भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होटेज सामना होत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर होणारा हा पहिला सामना आहे. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध सामना खेळू नये यासाठी देशभरातून विरोध होत आहे. पण आता सामना होणार यात काही शंका नाही. बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. आशिया आणि आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळावं लागेल. सरकारनेही मल्टी नेशन स्पर्धेत भारताला खेळण्याची परवानगी दिली आहे. असं सर्व वातावरण असताना टीम इंडिया कोणत्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरेल याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने टीम इंडियाच्या प्लेइंग 11 वर संताप व्यक्त केला आहे. कारण युएई विरूद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला बेंचवर बसवल्याने आर अश्विनने आश्चर्य व्यक्त केलं आहे.

आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, अर्शदीप सिंगला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळण्याचा हक्क आहे. जर शुबमन गिलला ओपनिंग, सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर आणि जसप्रीत बुमराहला 11 व्या क्रमांकावर लॉक करू शकता. तर टी20 मधील बेस्ट गोलंदाज असलेल्या गोलंदाजाला गॅरंटी स्पॉट का देऊ शकत नाही? या निर्णयाने मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पद्धतीचे निर्णय फलंदाजांकडून घेतले जातात. ज्यांनी आपल्या आयुष्यात कधी गोलंदाजी केली नाही. गोलंदाज वर्षानुवर्षे सुधारणा करण्यात वेळ व्यतित करतात. जेव्हा त्यांना बसवलं जातं तेव्हा त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो.

आर अश्विनने पुढे सांगितलं की, अर्शदीप सिंग सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याला आपली वर्षे काही परत मिळणार नाहीत. जर कोणत्या खेळाडूकडे टॅलेंट आहे तर त्याच्या खेळण्याचा हक्क आहे. त्याला फक्त फलंदाज नसल्याने बाहेर बसवणे, ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. क्रिकेटमध्ये चार षटकांचा एक तगाडा स्पेल सामन्याचा निर्णयात बदल करू शकतो. गोलंदाजांना आपल्या टॅलेंटवर अभिमान असायला हवा. त्यांना बसवल्यानंतर गप्प बसू नये.