AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वीच राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन ठरला, द्रविडने फोन उचलला आणि म्हणाला…

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी आता फ्रेंचायझी वेगाने कामाला लागल्या आहेत. मेगा लिलाव असल्याने आतापासून संघ बांधणीचं काम सुरु झालं आहे. आयपीएलच्या 18 व्या पर्वात राजस्थान रॉयल्स संघाने राहुल द्रविडच्या हाती प्रशिक्षकपदाची सूत्र दिली आहेत. तसेच कर्णधार कोण असेल? हे देखील सांगितलं आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वीच राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन ठरला, द्रविडने फोन उचलला आणि म्हणाला...
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 06, 2024 | 8:40 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या पर्वासाठी सर्वच संघांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राजस्थान रॉयल्स हा संघ देखील यात मागे नाही. आयपीएलच्या पहिल्या पर्वात विजय मिळवल्यानंतर 16 पर्वात राजस्थानची जेतेपदाची झोळी रिती राहिली आहे. 2022 साली राजस्थान अंतिम फेरीत धडक मारली होती. पण गुजरात टायटन्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तर मागच्या पर्वात एलिमिनेटर फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पराभूत करत पुढचा मार्ग रोखला होता. असं असताना फ्रेंचायझीने आता प्रशिक्षकाची जबाबदारी राहुल द्रविडच्या खांद्यावर टाकली आहे. त्यामुळे संघाचं रुपडं पालटणार यात शंका नाही. आयपीएल 2025 मेगा लिलावात चांगल्या खेळाडूंसाठी फिल्डिंग लावली जाईल. दुसरीकडे, संजू सॅमसनला रिटेन करणार की रिलीज या बातम्यांना उधाण आलं आहे. असं असताना प्रशिक्षक राहुल द्रविडने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेताच कर्णधाराचं नाव जाहीर केलं आहे. राहुल द्रविडला एक फोन आला आणि त्याने थेट एका शब्दातच कर्णधारपदाचा विषय संपवून टाकला आहे.

राहुल द्रविड एका चेअरवर पाठमोरा बसला आहे. नेमका तेव्हाच त्याचा फोन वाजतो आणि त्यावर नाव असतं संजू सॅमसन याचं..राहुल द्रविड फोन उचलतो आणि म्हणतो ‘हॅलो कॅप्टन’…याचा अर्थ स्पष्ट आहे की राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझी संजू सॅमसनला रिटेन करणार आहे आणि त्याच्याकडेच कर्णधारपदाची धुरा असेल. पण यावर्षी त्याला अनुभवी राहुल द्रविडचं मार्गदर्शन लाभणार आहे. आयपीएलचं पहिलं पर्व राजस्थान रॉयल्सने आपल्या नावे केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत चषकासाठी आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

राहुल द्रविडने 2012 आणि 2013 या पर्वात राजस्थान रॉयल्स संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. त्यानंतर 2014 आणि 2015 या कालावधीत संघाचा मेंटॉरही राहिला आहे. दिल्लीचा मेंटॉर असताना त्याच्या कारकिर्दित संजू सॅमसनला ओळख मिळाली होती. आता पुन्हा एकदा राहुल द्रविड आणि संजू सॅमसन ही जोडी एकत्र दिसणार आहे. टीम इंडियात असताना राहुल द्रविडला हवी तशी संधी मिळाली नव्हती. पण आता संजू सॅमसन कर्णधार आणि राहुल द्रविड प्रशिक्षक असल्याने काय रणनिती असणार याकडे लक्ष लागून आहे.

हिवाळी अधिवेशन सुरूये की फॅशन शो... अंजली दमानिया यांचा संताप
हिवाळी अधिवेशन सुरूये की फॅशन शो... अंजली दमानिया यांचा संताप.
साहेबांनी आमचे खूप लाड केले, पंकजा मुंडेंकडून वडिलांच्या आठवणीना उजाळा
साहेबांनी आमचे खूप लाड केले, पंकजा मुंडेंकडून वडिलांच्या आठवणीना उजाळा.
एकनाथ शिंदेंचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
एकनाथ शिंदेंचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?
तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?.
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर.
आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर
आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर.
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन.
'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'
'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'.
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?.
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर.