PM Modi Dinner Party : पीएम मोदींच्या निवासस्थानी NDA खासदारांसाठी खास डिनर पार्टी, खाण्याच्या मेन्यूमध्ये काय-काय होतं?
PM Modi Dinner Party : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व खासदारांसाठी डिनर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पीएम मोदींनी स्वत: सर्वांची आस्थेने चौकशी केली. खाण्याच्या मेन्यूमध्ये काय-काय होतं? जाणून घ्या.

PM Modi Dinner : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री एनडीए खासदारांसाठी मेजवानीच आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक टेबलावर गेले. त्यांनी सर्व खासदारांची आस्थेने विचारपूस केली. त्यांना विशेष आग्रहाने खायला लावलं. इतकचं नाही, भारताची विकास यात्रा मजबूत करण्यासाठी मिळून काम करण्याचं संकल्प केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी यांच्या निवासस्थानी डीनरमध्ये प्रत्येक राज्याचा कुठला ना कुठला पदार्थ होता. पीएम मोदी यांच्या निवासस्थानी एनडीए खासदारांनी कुठल्या, कुठल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला जाणून घ्या.
पीएम मोदी यांनी आपल्या निवासस्थानी 7 लोक कल्याण मार्गावर एनडीए खासदारांसाठी डिनरची व्यवस्था केली होती. बिहार विधानसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर हा डीनर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने 243 सदस्यांच्या सभागृहात तब्बल 202 जागा जिंकल्या. डिनरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट केली. खासदार वेगवेगळ्या बसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोक कल्याण मार्ग निवासस्थानी पोहोचले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, पीएम मोदींच्या घरी प्रत्येक राज्याचा एकतरी खाद्यपदार्थ होता. काश्मीरचा कहवा, बंगलाच रसगुल्लाल, पंजाबची मिस्सी रोटी. एकूणच भारतीय खाद्यपदार्थांच्या डिशेज होत्या.
मेन्यूमध्ये काय-काय होतं?
बंगालचा रसगुल्ला, आल्यासह संत्र्याचा ज्यूस, डाळींबाचा ज्यूस, कोथिंबीर वडी, गोंगूरा पनीर, खुबानी मलाई कोफ्ता, गाजर मेथी मटर, भिंडी सांभरिया, पालकुरा पप्पू, काळे मोती चिलगोजा पुलाव, भारतीय ब्रेड: रोटी/ मिस्सी रोटी/ नान/ तवा लच्छा पराठा, बेक्ड पिस्ता लांगचा, पिस्ता मिठाई,सूका मेवा, ताजी फळं, कहवा.
Was a delight to have hosted NDA MPs for dinner at 7, Lok Kalyan Marg this evening. The NDA family represents a shared commitment to good governance, national development and regional aspirations. Together, we will continue working to strengthen our nation’s development journey…
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2025
पीएम मोदी काय म्हणाले?
सोमवारी सकाळी बिहारमधील एनडीएच्या नेत्यांनी या मोठ्या विजयाबद्दल पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. पीएम मोदींनी जन कल्याणासाठी अधिक जोरात काम करण्याचा सल्ला दिला. मंगळवारी एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारत आता पूर्णपणे सुधार एक्सप्रेसच्या टप्प्यात आहे. सुधारणा वेगाने आणि स्पष्ट हेतूने होत आहेत. सरकारी सुधारणा या पूर्णपणे जनकेंद्रीत आहेत, यावर पीएम मोदींनी भर दिला. लोकांच्या दैनंदिन जीवनातील अडथळे दूर करणं हा यामागे उद्देश आहे”
