Video : राजस्थानचा 24 धावांनी लखनौवर विजय, पॉईंट्स टेबलमध्ये कुणाची आगेकूच? संजूनं मैदानात नेमकं काय केलं? पंच का चक्रावला? पाहा Highlights Video

| Updated on: May 16, 2022 | 6:05 AM

हुडाने 39 चेंडूत 59 धावांची शानदार खेळी खेळली. चहलने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

Video : राजस्थानचा 24 धावांनी लखनौवर विजय, पॉईंट्स टेबलमध्ये कुणाची आगेकूच? संजूनं मैदानात नेमकं काय केलं? पंच का चक्रावला? पाहा Highlights Video
राजस्थानचा 24 धावांनी लखनौवर विजय
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : राजस्थान रॉयल्सनं (RR) आयपीएल (IPL 2022) च्या 63 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी पहिले केली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सला 20 षटकांत 8 बाद 154 धावाच करता आल्या. लखनौसाठी डेकाकने 7, कर्णधार केएल राहुलने 10 धावा केल्या. बडोनी खाते उघडू शकले नाहीत. दीपक हुडा ५९ धावा करून बाद झाला. कृणाल पंड्या 25 धावा करू शकला. स्टॅनिशने 27 धावांची खेळी खेळली. लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज दीपक हुडा स्टंपिंगचा बळी ठरला आहे. हुडाने 39 चेंडूत 59 धावांची शानदार खेळी खेळली. चहलने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

पंच का चक्रावला?

दरम्यान, दीपक हुडाला यष्टीचीत करण्यासाठी राजस्थानचा कर्णधार संजूने खूप प्रयत्न केले. संजूने जे केलं ते पाहून पंचही चक्रावल्याचं दिसून आलं. अखेर त्यांना तिसऱ्या पंचाची मदत घ्यावी लागली.

हुडा आणि पंड्या यांच्यात 50 हून अधिक भागीदारी

दीपक हुडा आणि कृणाल पंड्या यांनी चौथ्या विकेटसाठी 41 चेंडूत 61 धावांची भागीदारी केली.