Video : ‘ज्युनियर मलिंगा’ने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली, ऋद्धिमानचं अकरावं अर्धशतक, पाहा Highlights Video

पाथीरानाने आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलला अल्बडब्ल्यू बाद केले. शुभमन 17 चेंडूत 18 धावा करू शकला.

Video : 'ज्युनियर मलिंगा'ने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली, ऋद्धिमानचं अकरावं अर्धशतक, पाहा Highlights Video
गुजरात टायटन्सचा 10वा विजयImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 7:49 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आजचा 62 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात झाला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 133 धावा केल्या. अशा स्थितीत 134 धावांचे लक्ष्य गुजरातनं 19.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. गुजरातने 10वा सामना 7 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 53, एन जगदीसनने नाबाद 39, मोईन अलीने 21 आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 7 धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमीने दोन तर राशिद खान, अल्झारी जोसेफ आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. शुभमन गिल 18 धावा करून बाद झाला. मॅथ्यू वेड 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पंड्या 7 धावा करून बाद झाला. रिद्धिमान साहा 67 आणि डेव्हिड मिलर 15 धावा करून नाबाद परतला.

ज्युनियर मलिंगाने पहिल्याच बॉलवर घेतली विकेट

आठव्या षटकात श्रीलंकेचा युवा गोलंदाज मथिशा पाथिराना गोलंदाजीसाठी आला. ‘ज्युनियर मलिंगा’ असेही संबोधले जाते. पाथीरानाने आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलला LBW बाद केले. शुभमन 17 चेंडूत 18 धावा करू शकला.

गुजरातला दुसरा धक्का

12व्या षटकात 90 धावांवर गुजरातला दुसरा धक्का बसला. मोईन अलीने मॅथ्यू वेडला शिवम दुबेकडून झेलबाद केले. वेड 15 चेंडूत 20 धावा करून बाद झाला.

 गुजरातला 100 च्या स्कोअरवर तिसरा धक्का

गुजरात टायटन्सला 14व्या षटकात 100 धावांवर तिसरा धक्का बसला. मथिशा पाथिरानाने गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला शिवम दुबेकडून झेलबाद केले. पाथीरानाला सहा चेंडूंत सात धावा करता आल्या. पाथीरानाचे हे दुसरे यश ठरले. तत्पूर्वी त्याने शुभमनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

ऋद्धिमानचे अकरावे अर्धशतक

ऋद्धिमान साहाने 42 चेंडूत 50 धावा केल्या आहेत. साहाने आयपीएल कारकिर्दीतील अकरावे अर्धशतक झळकावले.

पॉईट्स टेबलची काय स्थिती?

आजच्या विजयासह गुजरातनं गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखत अव्वल दोनमध्ये आपले स्थान पक्के केलं आहे. संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गटातील शेवटचा सामना खेळायचा आहे. तो सामना गमावल्यानंतरही गुजरात संघ पहिले दोन स्थान कायम राखेल. याचाच अर्थ संघाला अंतिम फेरीत जाण्याची अतिरिक्त संधी मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.