AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs GT Live Streaming : गुजरातसमोर राजस्थानचं आव्हान, शुबमनसेना गेल्या पराभवाचा हिशोब करणार?

Rajasthan Royals vs Gujarat Titans IPL 2026 Live Scorecard : राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात शनिवारी 9 मे रोजी 2 गुणांसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

RR vs GT Live Streaming : गुजरातसमोर राजस्थानचं आव्हान, शुबमनसेना गेल्या पराभवाचा हिशोब करणार?
RR vs GT Live Streaming IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 09, 2026 | 7:16 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 52 व्या सामन्यात शनिवारी 9 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्यानिमित्ताने 2 युवा कर्णधार भिडणार आहेत. रियान पराग राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. गुजरात आणि राजस्थान दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील 11 वा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांत सातवा सामना जिंकण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कधी?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना शनिवारी 9 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कुठे?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर इथे होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे स्मार्ट टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉपद्वारे पाहायला मिळेल.

गुजरातकडे हिशोब करण्याची संधी

गुजरात आणि राजस्थान दोन्ही संघांची 9 मे रोजी आमनेसामने येण्याची 19 व्या मोसमातील दुसरी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ 4 एप्रिलला आमनेसामने आले होते. त्या सामन्यात राजस्थान टीमने गुजरातवर 6 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे गुजरात राजस्थान विरुद्ध 2 पॉइंट्सचा हिशोब करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आता त्यात गुजरातला किती यश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

राजस्थान विरुद्ध गुजरात यांच्यातील हा एकूण 10 वा सामना असणार आहे. याआधी उभयसंघात एकूण 9 सामने खेळवण्यात आले आहेत. या 9 पैकी सर्वाधिक 6 सामन्यात गुजरातने विजय मिळवला आहे. तर राजस्थान 3 वेळा यशस्वी ठरली आहे. त्यामुळे आता कोण मैदान मारतो यासाठी निकालापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पॉइंट्स टेबलमधील दोन्ही संघांची स्थिती

दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार, नेट रनरेटचा अपवाद वगळल्यास दोन्ही संघांची कामगिरी सारखीच आहे.राजस्थान आणि गुजरातने 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 सामने गमावले आहेत. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या तर गुजरात पाचव्या स्थानी आहे. राजस्थानचा नेट रनरेट हा +0.510 असा आहे. तर गुजरातचा नेट रनरेट हा -0.147 इतका आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत