AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs MI Score Updates and Highlights IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 27 धावांनी नमवलं

| Updated on: Apr 08, 2026 | 4:34 AM
Share

Rajasthan Royals vs Mumbai Indians Indian Premier League 2026 Score and Updates In Marathi : राजस्थानने मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल कामगिरी करत सलग तिसरा सामना जिंकला आहे. राजस्थानने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

RR vs MI Score Updates and Highlights IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 27 धावांनी नमवलं
RR vs MI IPL 2026 Live ScoreImage Credit source: TV9

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 13 व्या सामन्यात यजमान राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. हा सामना बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानात अर्थात गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये पाहुण्या मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आणि विजयाची हॅट्रिक केली.  दोन्ही संघांचा हा तिसरा सामना होता. मुंबईने 2 पैकी 1 सामना जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात मुंबईचा दिल्लीने पराभव केला होता. त्यामुळे मुंबईसमोर दिल्ली विरुद्ध कमबॅक करण्याचं आव्हान होतं. मात्र मुंबई राजस्थानसमोर अपयशी ठरली.  पावसामुळे उभयसंघातील सामना  11 षटकांचा खेळवण्यात आला. राजस्थानने 3 विकेट्स गमावून 150 धावा केल्या. मात्र विजयी धावांचा पाठलाग करताना मुंबईला 9 विकेट्स गमावून 123 धावांपर्यंतच पोहचता आलं. राजस्थानने अशाप्रकारे हा सामना जिंकला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 08 Apr 2026 12:30 AM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : राजस्थानचा 27 धावांनी विजय

    राजस्थान रॉयल्सने सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सला 27 धावांनी पराभूत करत गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. पावसामुळे हा सामना 11 षटकांचा झाला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 150 धावा केल्या आणि विजयासाठी 151 धावांचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्स 11 षटकात 9 गडी गमवून 123 धावा करू शकला.

  • 08 Apr 2026 12:25 AM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : ट्रेंट बोल्ट धावचीत

    ट्रेंट बोल्टच्या रुपाने मुंबई इंडियन्सला नववा धक्का बसला आहे. ट्रेंट बोल्ट धावचीत झाला. त्याने 2 चेंडूत 1 धाव करून बाद झाला.

  • 08 Apr 2026 12:22 AM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : शार्दुल ठाकुर बाद

    शार्दुल ठाकुर 7 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा पराभव आता औपचारिकता असणार आहे. कारण प्रत्येक चेंडूवर षटकार मारणार फलंदाज उरला नाही.

  • 08 Apr 2026 12:17 AM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : मुंबई इंडियन्सला सातवा धक्का

    मुंबई इंडियन्सचा पराभव आता निश्चित झाला आहे. नमन धीर बाद झाल्याने आता मोठे  फटके मारणारा फलंदाज कोणीच उरला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सला सातवा धक्का बसला. नमन धीर 13 चेंडूत 25 धावा करून बाद झाला.

  • 08 Apr 2026 12:11 AM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : मुंबई इंडियन्सला सहावा धक्का

    मुंबई इंडियन्सला रदरफोर्डच्या रूपाने सहावा धक्का बसला आहे. 8 चेंडूत 25 धावांची खेळी करून बाद झाला. रदरफोर्ड बाद झाल्याने उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या आहेत.

  • 07 Apr 2026 11:55 PM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : तिलक वर्माची विकेट

    टीम इंडियाचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. त्यामुळे पराभव आता निश्चित झाला आहे. तिलक वर्माच्या रूपाने पाचवा धक्का बसला. 10 चेंडूत 14 धावा करून बाद झाला आहे.

  • 07 Apr 2026 11:52 PM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : मुंबई इंडियन्सला चौथा धक्का, हार्दिक पांड्या बाद

    हार्दिक पांड्याही काही खास करू शकल नाही. रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या नादात झेल बाद झाला. त्यामुळे या सामन्यात मुंबईचा पराभव आता निश्चित झाला आहे.

  • 07 Apr 2026 11:44 PM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का

    राजस्थान रॉयल्सने बलाढ्य आव्हान दिलं असताना मुंबई इंडियन्सचा डाव पत्त्यासारखा कोसळला. रोहित शर्माही काही खास करू शकला नाही.  6 चेंडूत 5 धावा करून बाद झाला.

  • 07 Apr 2026 11:35 PM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव बाद

    मुंबई इंडियन्स सूर्यकुमार यादवच्या रूपाने दुसरा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादव 3 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. त्यामुळे मुंई इंडियन्सचं टेन्शन वाढलं आहे.

  • 07 Apr 2026 11:34 PM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, रयान बाद

    मुंबई इंडियन्सला रयान रिकल्टनच्या रूपाने पहिला धक्का बसला आहे. 8 धावा करून जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला. मोठं आव्हान असल्याने मुंबई इंडियन्सला ही विकेट धावगतीला ब्रेक लावणारी ठरली.

  • 07 Apr 2026 11:26 PM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, रोहित-रायन मैदानात, 151 धावांचं आव्हान

    मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे.  रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात आली आहे.  राजस्थानने मुंबईसमोर 11 षटकांच्या सामन्यात 151 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

  • 07 Apr 2026 11:15 PM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : यशस्वीचं अर्धशतक, मुंबईसमोर 151 धावांचं आव्हान, राजस्थान जिंकणार?

    राजस्थान रॉयल्सने 11 षटकांच्या सामन्यात फटकेबाजी केली आहे. राजस्थानने गुवाहाटीत मुंबई इंडियन्ससमोर 151 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 3 विकेट्स गमावून 11 ओव्हरमध्ये 150 रन्स केल्या. राजस्थानसाठी  यशस्वीने सर्वाधिक 77 धावा केल्या. आता मुंबई हे आव्हान पूर्ण करत जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 07 Apr 2026 10:56 PM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : राजस्थानला तिसरा झटका, कॅप्टन रियान पराग आऊट

    अल्लाह गजनफर याने राजस्थानचा कॅप्टन रियान पराग याला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. अल्लाहने यासह वैयक्तिक दुसरी विकेट मिळवत राजस्थानला तिसरा झटका दिला आहे. रियानने 20 धावा केल्या.

  • 07 Apr 2026 10:44 PM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : राजस्थानला दुसरा झटका, ध्रुव जुरेल आऊट, मुंबईचं कमबॅक

    मुंबईने राजस्थानला दुसरा झटका दिला आहे. अल्लाह गजनफर याने ध्रुव जुरेल याला 2 रन्सवर एलबीडब्ल्यू आऊट केलं आहे. त्यामुळे राजस्थानचा स्कोअर 5.4 ओव्हरमध्ये 2 आऊट 84 असा झाला आहे.

  • 07 Apr 2026 10:41 PM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : शार्दूलकून वैभव सूर्यवंशीची शिकार, राजस्थानला पहिला झटका

    शार्दूल ठाकुर याने राजस्थान रॉयल्सला पहिला झटका दिला आहे. शार्दूलने विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. वैभवने 14 बॉलमध्ये 39 रन्स केल्या.

  • 07 Apr 2026 10:33 PM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : वैभव-यशस्वीचा तडाखा, राजस्थानची पलटण विरुद्ध आक्रमक सुरुवात

    वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल राजस्थानच्या या युवा आणि ओपनिंग जोडीने मुंबई विरुद्ध आक्रमक आणि तडाखेदार सुरुवात केली आहे. या दोघांनी 11 ओव्हरच्या सामन्यातील पहिल्या 4 षटकांत 62 धावांची भागीदारी केली आहे.

  • 07 Apr 2026 10:13 PM (IST)

    RR vs MI Live Score, IPL 2026 : सामन्याला अखेर सुरुवात, राजस्थानची युवा जोडी मैदानात

    पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर राजस्थान विरुद्ध मुंबई सामन्याला सुरुवात झाली आहे.  मुंबईने राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 07 Apr 2026 10:04 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, अल्लाह गझनफर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

  • 07 Apr 2026 10:03 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन

    राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग (कॅप्टन), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे आणि संदीप शर्मा.

  • 07 Apr 2026 09:58 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : मुंबईने टॉस जिंकला, राजस्थान विरुद्ध निर्णय काय?

    मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने राजस्थान विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. उभयसंघात पावसामुळे 11 ओव्हरचाच सामना होणार आहे.ं

  • 07 Apr 2026 09:54 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : राजस्थान-मुंबई 20 ओव्हरचा सामना होणार नाही, जाणून घ्या अपडेट

    राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात पावसामुळे 20 ओव्हरचा सामना होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पावसामुळे 2 तासांपेक्षा वेळ वाया गेला. त्यामुळे आता 20 ऐवजी 11 षटकांचा खेळ होणार आहे.

  • 07 Apr 2026 09:40 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : मस्त रे, टॉसची वेळ ठरली, किती वाजता होणार?

    गुवाहाटीत पाऊस थांबल्यांतर मोठी अपडेट समोर आली आहे. राजस्थान विरुद्ध मुंबई सामन्यासाठी रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी टॉस होणार आहे.

  • 07 Apr 2026 09:08 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : थांबला एकदाचा, पावसाची विश्रांती, आता चाहत्यांना टॉसची प्रतिक्षा

    गुवाहाटीत 2 तासांच्या बॅटिंगनंतर अखेर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे दोन्ही संघांसह चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता चाहत्यांना टॉस केव्हा होणार? याची प्रतिक्षा लागून आहे.

  • 07 Apr 2026 09:00 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : नॉनस्टॉप सुपरफास्ट, गुवाहाटीत पावसाची बॅटिंग सुरुच

    एका बाजूला ग्राउंड स्टाफचे खेळपट्टी आणि मैदान कोरडं करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला गुवाहाटीत पावसाची बॅटिंग सुरुच आहे. त्यामुळे पाऊस थांबण्याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे.

  • 07 Apr 2026 08:07 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : पावसामुळे चाहत्यांची निराशा, टॉस किती वाजता होणार?

    पावसामुळे राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातील नाणेफेकीला विलंब झाला आहे. टॉस 7 वाजता होणार होता. मात्र 8 वाजून गेल्यानंतरही अद्याप टॉस झालेला नाही. त्यामुळे चाहत्यांना टॉसची प्रतिक्षा लागून आहे.

  • 07 Apr 2026 07:07 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : राजस्थान-मुंबई सामना, पावसामुळे टॉसला विलंब

    राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील टॉस नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होणं अपेक्षित होतं. मात्र गुवाहाटीत पाऊस होत असल्याने टॉसला विलंब झाला आहे.

  • 07 Apr 2026 07:01 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : राजस्थान-मुंबई आमनेसामने, थोड्याच वेळात टॉस, कोण जिंकणार?

    राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 07 Apr 2026 06:44 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : मुंबई राजस्थानवर वरचढ

    मुंबईने आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध सर्वाधिक सामने जिंकले आहेत. उभयसंघात एकूण 31 सामने झाले आहेत. मुंबईने त्यापैकी 16 सामने जिंकले आहेत. तर राजस्थानने 14 सामन्यांत विजय मिळवला आहे.

  • 07 Apr 2026 06:40 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : राजस्थान-मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

    आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात राजस्थान रॉयल्स अजिंक्य आहेत. राजस्थानने दोन्ही सामना जिंकलेत. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. तर मुंबईने 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

  • 07 Apr 2026 06:28 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : राजस्थान रॉयल्स टीम

    राजस्थान रॉयल्स टीम : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग (कॅप्टन), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, लुआन-ड्रे प्रिटोरियस, ब्रिजेश शर्मा, रवी सिंग, शुभम दुबे, ॲडम मिल्ने, दासून शनाका, कुलदीप सेन, सुशांत मिश्रा, युधवीर सिंग चरक, क्वेना मफाका, विघ्नेश पुथूर आणि अमन राव पेराला.

  • 07 Apr 2026 06:27 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : मुंबई इंडियन्स टीम

    मुंबई इंडियन्स टीम : रयान रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, मिशेल सँटनर, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकुर दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, मयंक मारकंडे, ट्रेंट बोल्ट, रॉबिन मिंज, राज बावा, अश्विनी कुमार, हार्दिक पंड्या, क्विंटन डी कॉक, विल जॅक्स, मयंक रावत, रघु शर्मा, अथर्व अंकोलेकर, एएम गजनफर, दानिश मालेवार आणि मोहम्मद सलाहुद्दीन इजहार.

  • 07 Apr 2026 06:20 PM (IST)

    RR vs MI Live Updates, IPL 2026 : मुंबईसमोर होम टीम राजस्थानचं आव्हान, पलटण ट्रॅकवर परतणार?

    राजस्थान रॉयल्स आज मंगळवारी 7 एप्रिलला घरच्या मैदानात आपल्या मोहिमेतील तिसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. राजस्थान या सामन्यात मुंबई विरुद्ध भिडणार आहे. मुंबईला या मोसमातील 2 पैकी 1 सामनाच जिंकता आला आहे. त्यामुळे पलटण या सामन्यात विजय मिळवून कमबॅक करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published On - Apr 07,2026 6:14 PM

Follow Us
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक.
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय......
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते.....
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते......
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?.
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका.
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे....
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे.....
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?.
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!.
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा.
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल.