Ranji Trophy Final 2022: जाणून घ्या फायनलमधील मुंबईच्या रणजी संघाचे दुसऱ्यादिवसाचे Update, गोलंदाजांवर मदार, स्पेशल VIDEO

Ranji Trophy Final 2022: बंगळुरुमध्ये हा रणजी सामना सुरु आहे. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. मुंबईचा संघ 42 व्यां दा रणजीचे विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

Ranji Trophy Final 2022: जाणून घ्या फायनलमधील मुंबईच्या रणजी संघाचे दुसऱ्यादिवसाचे Update, गोलंदाजांवर मदार, स्पेशल VIDEO
sarfaraz khanImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 5:56 PM

मुंबई: मुंबई आणि मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya Pradesh) या दोन टीम्समध्ये यंदाच्या रणजी सीजनची फायनल (Ranji Final) सुरु आहे. बंगळुरुमध्ये हा रणजी सामना सुरु आहे. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. मुंबईचा संघ 42 व्यां दा रणजीचे विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. आज दुसऱ्यादिवसाच्या खेळावर मध्य प्रदेशने वर्चस्व गाजवलं. मुंबईकडून आज फक्त सर्फराज खान (Sarfaraz Khan) एकाकी लढला. एकाबाजूने विकेट पडत असताना त्याने एकाकी किल्ला लढवला. सर्फराजने आज कठीण प्रसंगात मुंबईसाठी शतक झळकावलं. त्याने 243 चेंडूत 134 धावा फटकावल्या. यात 13 चौकार आणि 2 षटकार आहेत. सर्फराजच्या या खेळीच्या बळावर मुंबईने पहिल्याडावात 374 धावा केल्या. सर्फराज शिवाय मुंबईकडून यशस्वी जैस्वालने 78 धावा केल्या. काल पहिल्या दिवसअखेरी मुंबईच्या पाच बाद 248 धावा झाल्या होत्या. कालच्या धावसंख्येत मुंबईने आज फक्त 126 धावांची भर घातली.

क्लिक करुन पहा सर्फराज खानची शतकी खेळी

गौरव यादव यशस्वी गोलंदाज

आज दुसऱ्यादिवशी मुंबईला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. शम्स मुलानीच्या रुपाने मुंबईला आज पहिला धक्का बसला. मुलानी कालच्या धावसंख्येवर 12 धावांवरच बाद झाला. त्याला गौरव यादवने पायचीत पकडलं. त्यानंतर काल 40 धावांवर नाबाद असलेल्या सर्फराज खान आणि तनुष कोटियनने डाव पुढे नेला. त्यांनी आणखी 40 धावांची भर घातल्यानंतर कोटियनच्या रुपाने मुंबईचा सातवा गडी बाद झाला. त्याला सुद्धा गौरव यादवने 15 धावांवर क्लीन बोल्ड केलं. धवन कुलकर्णी 1 आणि तृषार देशपांडे 6 धावांवर बाद झाला. 134 धावांवर खेळणाऱ्या सर्फराज खानला गौरव यादवने श्रीवास्तवकरवी झेलबाद केलं. मध्य प्रदेशकडून गौरव यादव यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. अनुभव अग्रवालने 3, सारांश जैनने 2 आणि कुमार कार्तिकेयने एक विकेट घेतला.

गौरव यादवची भेदक गोलंदाजी इथे क्लिक करुन पहा

मुंबईच्या गोलंदाजांचा संघर्ष

मुंबईचा डाव संपल्यानंतर फलंदाजीला आलेल्या मध्य प्रदेशने चांगली सुरुवात केली आहे. फक्त हिमांशु मंत्रीच्या (31) रुपाने त्यांची एक विकेट गेली आहे. सलामीवीर यश दुबे (44), शुभम शर्मा (41) धावांवर खेळतोय. हिमांशू शर्माला देशपांडेने पायचीत पक़डलं. मुंबईच्या गोलंदाजांना आज संघर्ष करावा लागला. उद्या मुंबईच्या गोलंदाजांना सरस कामगिरी करावीच लागेल, तरच मुंबईच्या 42 व्या रणजी विजेतेपदाच स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.