Cheteshwar Pujara | चेतेश्वर पुजाराचा तडाखा सुरुच, 63 व्या शतकासह मोठा धमाका

Cheteshwar Pujara Century | अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील तिसरं आणि एकूण 63 वं शतक ठोकलं. पुजाराच्या या खेळीमुळे सौराष्ट्र टीम भक्कम स्थितीत पोहचली.

Cheteshwar Pujara | चेतेश्वर पुजाराचा तडाखा सुरुच, 63 व्या शतकासह मोठा धमाका
| Updated on: Feb 17, 2024 | 6:01 PM

राजकोट | टीम इंडियाचा तारणहार आणि राहुल द्रविडचा क्रिकेटमधील वारसदार चेतेश्वर पुजारा याने आपला शतकी तडाखा सुरुच ठेवला आहे. टीम इंडियातून बाहेर असलेल्या चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी स्पर्धेत शतकांचा लावलेला सपाटा कायम आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतल ईलाईट ग्रुप एमध्ये सौराष्ट्र विरुद्ध मनिपूर यांच्यातील सामन्यात चेतेश्वर पुजारा याने बेझबॉल स्टाईल शतक केलं आहे. तर पुजाराचं हे फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 63 वं शतक आहे.

चेतेश्वर पुजाराने 102 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. मात्र शतकानंतर पुजाराला फार वेळ मैदानात राहू शकला नाही. पुजाराने 105 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 12 चौकारांच्या मदतीने 108 धावांची खेळी केली. पुजाराचं हे या हंगामातील तिसरं शतक ठरलं. पुजाराने याआधी झारखंड विरुद्ध नाबाद 243 धावांची द्विशतकी खेळी केली. तर त्यानंतर राजस्थान विरुद्ध 110 धावा केल्या.

दरम्यान चेतेश्वर पुजारा याच्या व्यतिरिक्त मणिपूर विरुद्ध सौराष्ट्रकडून कॅप्टन अर्पित वसावडा याने 148 धावांची खेळी केली. अर्पितने या खेळीत 197 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 18 चौकार ठोकले. तर प्रेरक मांकड यानेही 173 धावांची तुफानी खेळी केली. प्रेरकच्या या खेळीत 19 चौकार आणि 1 सिक्सचा समावेश होता.

चेतेश्वर पुजारा याची या हंगामातील कामगिरी

दरम्यान चेतेश्वर पुजारा याच्यासाठी हा हंगाम जबरदस्त राहिलाय. पुजाराने आतापर्यंत अनुक्रमे 243*(356), 49(100), 43(77), 43(105), 66(137), 91(133), 3(16), 0(6), 110(230), 25(60) आणि 108(105) अशा धावा केल्या आहेत.

चेतेश्वर पुजारा याचा रणजी ट्रॉफीत धावांचा पाऊस


सौराष्ट्र प्लेईंग ईलेव्हन | अर्पित वसावडा (कर्णधार), केविन जीवराजानी, हार्विक देसाई (विकेटकीपर), चेतेश्वर पुजारा, शेल्डन जॅक्सन, प्रेरक मांकड, चिराग जानी, धर्मेंद्रसिंह जडेजा, युवराजसिंह डोडिया, पार्थ भूत आणि चेतन साकरिया.

मणिपूर प्लेईंग ईलेव्हन | लँगलोनयम्बा केशांगबम (कॅप्टन), रोनाल्ड लाँगजम , अल बाशिद मुहम्मद (विकेटकीपर), कर्नाजित युमनम, जॉन्सन सिंग, बिकाश सिंग, अजय लामाबम सिंग, बिश्वरजित कोन्थौजम, बसीर रहमान, कंगाबम प्रियोजित सिंग आणि चोंगथम मेहुल.