Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने मैदानात उतरताच केला मोठा विक्रम, धोनी आणि रैनाच्या यादीत समावेश

| Updated on: Apr 09, 2022 | 8:34 PM

आयपीएल 2022च्या सीजन 15 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद या दोन संघामध्ये नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सामना झाला. यात रवींद्र जडेजाने एक वेगळा विक्रम केलाय. काय केलाय विक्रम, ते जाणून घ्या...

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने मैदानात उतरताच केला मोठा विक्रम, धोनी आणि रैनाच्या यादीत समावेश
अनफॉलो केल्याचा वाद
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आयपीएल 2022च्या (IPL 2022) सीजन 15 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद (CSK vs SRH) या दोन संघामध्ये नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सामना झाला. या सामन्यात चेन्नईनं हैदराबादला 155 धावांचं लक्ष्य दिलंय. त्याला हैदराबादने उत्तर दिसून चेन्नईला चौथ्याही सामन्यात विजयापासून अडवलं आहे. या सीजनमधील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या चेन्नईने (CSK) हैदराबादच्या विरुद्ध सुरुवात तर चांगली केली. मात्र, त्यांना आणखी चांगले रन बनवता आले असते. पण, तसं चेन्नईच्या संघाला जमलं नाही. रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड हे चांगले खेळत होते. पण त्यांना चांगले रन नाही काढता आले. त्यानंतर रायडू आणि मोईन अली यांनी संघासाठी चांगली खेळू करुन रन बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही त्यांना फारस यश आल्याचं दिसलं नाही. या सामन्यात महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा हरल्याचं दिसून आलं. त्यापूर्वी शिवम दुबे याने तीन रन बनवले आणि तोही आऊट झाला. तर शेवटच्या ओवरमध्ये रवींद्र जडेजाच्या तुफान फलंदाजीने चेन्नईला दीडशेच्या जवळपास रन बनवता आले. यामध्ये विशेष कामगिरी केली ती जडेजाने. यामुळेच जडेजाची चहुकडे चर्चा आहे. जडेजाने विक्रमही नावावर केला आहे.

जडेजाने कोणता विक्रम केला?

रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्ससोबत 2012पासून खेळतो आहे. त्याच्या दशकभराच्या कारकिर्दीत हा अष्टपैलू खेळाडू प्रतिभावान खेळाडूपासून मोठा खेळाडू बनला आहे. जडेजा सीएसकेसाठी 110 बळी घेणारा तिसरा सर्वाधिक मोठा गोलंदाज आहे. एक फलंदाज म्हणून त्याने चेन्नई संघासाठी 1 हजार 523 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रवींद्र जडेजाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आणखी एक टप्पा गाठला. चेन्नई सुपर किंग्जकडून 150 सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू ठरला. डीवाय पाटील स्टेडियमवर आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने हा टप्पा गाठला. त्याच्या आधी, फक्त दोन CSK क्रिकेटपटू, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (218 सामने) आणि सुरेश रैना (200 सामने) यांनी चार वेळा आयपीएल चॅम्पियन म्हणून ही कामगिरी केली आहे.

तुम्हाला हे माहीत आहे का?

9 वर्षे 2021 पर्यंत फास्ट फॉरवर्ड आणि CSK अजूनही जडेजाकडे विशेष कामगिरीसाठी पाहत आहेत. गेल्या वर्षी जडेजाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 28 चेंडूंत नाबाद 62 धावांची खेळी करून संघाला 69 धावांनी विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यात जडेजाने एका षटकात 36 धावा देत हर्षल पटेलचा थकवलं. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जकडून 150 सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. हे त्याच्या कामगिरीतलं एक यशोशिखर आहे.

इतर बातम्या 

Prithviraj Patil : कोण आहे पृथ्वीराज पाटील? ज्याने मैदान मारत कुस्तीच्या” पंढरी”चा 21 वर्षांचा वनवास संपवला

वकिल Gunratan Sadavarte यांच्यावर खोटा आरोप-Adv Mahesh Vaswani

Extended Lab: भारतातील पहिली एक्स्टेन्डेड रिअॅलिटी लॅब सुरू, कॅन्सरवर होणार आधुनिक उपचार