Prithviraj Patil : कोण आहे पृथ्वीराज पाटील? ज्याने मैदान मारत कुस्तीच्या” पंढरी”चा 21 वर्षांचा वनवास संपवला

कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने (Prithviraj Patil) मैदान मारलं आहे. त्याने अंतिम लढतीत सोलापूरच्या विशाला बनकरला आस्मान दाखवलं आहे. कुस्ती हा महाराष्ट्रच्या रक्तात मुरलेला खेळ आहे. त्यातत्या त्यात कोल्हापूरला तर जणू कुस्तीची पंढरी म्हटलं जातं. त्याच कोल्हापूरच्या मल्लाने यंदा मैदान मारलं आहे.

Prithviraj Patil : कोण आहे पृथ्वीराज पाटील? ज्याने मैदान मारत कुस्तीच्या पंढरीचा 21 वर्षांचा वनवास संपवला
यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, विशाल बनकरवर मातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 8:24 PM

सातारा : यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesri 2022) थरार हा साताऱ्यात रंगला होता. या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने (Prithviraj Patil) मैदान मारलं आहे. त्याने अंतिम लढतीत सोलापूरच्या विशाला बनकरला आस्मान दाखवलं आहे. कुस्ती हा महाराष्ट्रच्या रक्तात मुरलेला खेळ आहे. त्यातत्या त्यात कोल्हापूरला तर जणू कुस्तीची पंढरी म्हटलं जातं. त्याच कोल्हापूरच्या मल्लाने यंदा मैदान मारलं आहे. सोलापूरच्या विशाल बनकरला (Vishal Bankar) त्यांनी अंतिम लढतीत आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी ही मानाची गदा जिंकली आहे. आणि कोल्हापूरचा जणू 21 वर्षाचा महाराष्ट्र केसरी किताबाचा वनवास संपवला आहे. त्यामुळे सध्या पृथ्वीराज पाटील हा कुस्तीगिरांच्या आणि महाराष्ट्राच्या मनावर राज्य गाजवतोय. फायनलच्या या थरारात पृथ्वीराज पाटीलने शेवटच्या काही सेकंदात सामना पटला आहे.

कोण आहे पृथ्वीराज पाटील?

  1. मूळ गाव-कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील देवठाणे हे पृथ्वीराजचं मूळ गाव आहे.
  2. शिक्षण- पृथ्वीराज पाटील याने बारावीपर्यंत शिक्षण हे संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून पूर्ण केलं आहे.
  3. तालिम-त्याने कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीतून आपल्या कुस्तीच्या करिअरला सुरूवात केली आहे.
  4. वस्ताद- वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील आणि धनाजी पाटील अशा तगड्या कुस्तीगिरांकडून त्याला कुस्तीचे प्रशिक्षण मिळाले आहे.
  5. वजन- त्याचे सध्याचे वजन 95 किलो असल्याची माहिती देण्यात आली आहे.
  6. सैन्यात कार्यरत- तो आर्मीत हवालदार पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
  7. कास्य पदकाचीही कमाई- पृथ्वीराज पाटीलने याआधीही मोठं यश संपदान केलं आहे. त्याने ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत त्याने कास्य पदकाचीही कमाई केली आहे.
  8. विशाल बनकरवर मात- यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकरला फायनलमध्ये चितपट केलं आहे.
  9. सोलापूर विरुद्ध कोल्हापूर -मूळचा सोलापूरचा विशाल बनकर विरुद्ध कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील अशी ही लढत होती.
  10. 21 वर्षांची प्रतीक्षा संपवली- 21 वर्षानंतर कोल्हापूरला मानाची महाराष्ट्र केसरीची गदा मिळवूण देण्यात त्याला यश आले आहे.

Maharashtra Corona Update : सांताक्रुझमध्ये आढळला कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, आरोग्यमंत्र्यांची माहिती, खबरदारीच्या केंद्राच्या सूचना

Gunratna Sadavarte: सुरक्षेत चूक ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Jalgaon Murder : जळगावमध्ये दगडाने ठेचून एकाची हत्या, गेल्या पंधरवड्यातील चौथी घटना

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.