या कारणामुळे रवींद्र जडेजाची टीम इंडियात ‘घरवापसी’ नाहीच

या कारणामुळे रवींद्र जडेजाची टीम इंडियात ‘घरवापसी’ नाहीच
रवींद्र जाडेजाला देखील चेन्नईच्यावतीनं रिटेन केलं जाणार आहे. जाडेचा चेन्नईचा स्टार खेळाडू आहे. जाडेजानं त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चेन्नईला विजय मिळवून दिले आहेत. जाडेजानं गेल्या सीझनमध्ये 12 मॅचमध्ये 75 पेक्षा जास्त सरासरीनं 227 धावा केल्या होत्या. तर त्याचा स्ट्राईक रेट 145 होता याशिवाय त्यानं 13 विकेट घेतल्या होत्या.

टीम इंडियातील (team India) मधल्या फळीतील फलंदाज व फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) ‘घरवापसी’ होण्याची आशा धूसर होत चालली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 26, 2022 | 7:03 PM

मुंबई: टीम इंडियातील (team India) मधल्या फळीतील फलंदाज व फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) ‘घरवापसी’ होण्याची आशा धूसर होत चालली आहे. टी-20 विश्वचषकापासून भारतीय संघाबाहेर असलेला जडेजा अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. उजव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे रवींद्र जडेजा क्रिकेटपासून (cricket) दूर आहे. या दुखापतीमुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळू शकला नाही. त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिकेची तयारी करता आली नाही. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे आणि टी-20 मालिकेतही तो नसल्याची माहिती आहे.‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, रवींद्र जडेजा अजूनही तंदुरुस्त नाही. श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतून तो पुनरागमन करू शकतो. ही मालिका (series) फेब्रुवारीच्या अखेरीस खेळवली जाणार आहे. जर तो या मालिकेतही खेळला नाही तर रवींद्र जडेजा थेट यंदाच्या आयपीएलमध्येच मैदानात दिसणार आहे. जडेजा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा खेळाडू आहे. त्यामुळे तो पुढचा कर्णधार होऊ शकतो, असे मानले जात आहे.

विंडीजचा संघ फेब्रुवारीत दाखल

16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कोलकाता येथे वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी- 20 सामने खेळवले जाणार आहेत. याआधी 6 ते 9 फेब्रुवारीदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. हा सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. भारत- वेस्ट इंडिज मालिकेसाठी रवींद्र जडेजाची निवड न झाल्यास, त्याच्याऐवजी अक्षर पटेल किंवा कृणाल पटेलसारख्या खेळाडूंची टीम इंडियामध्ये निवड केली जाऊ शकते. वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा एक- दोन दिवसांत होणार आहे. आवेश खान आणि हर्षल पटेल या वेगवान गोलंदाजांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी- 20 मालिकेत संधी मिळू शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही त्याची निवड झाली होती.

अश्विन- भुवनेश्वर बाहेर

आर. अश्विन व भुवनेश्वर कुमार या खेळाडूंची वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान निवड होणार नसल्याची माहिती आहे. अश्विन जखमी झाल्याचे बोलले जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान तो ‘पेनकिलर’ इंजेक्शन घेऊन खेळत असल्याचे वृत्त होते. दुसरीकडे, भुवनेश्‍वर कुमारची अलीकडची कामगिरी चांगली नाही. त्यामुळे त्यांच्या खेळावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें