AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : Virat Kohli ने यशस्वी जैस्वालचं कौतुक करणारी इन्स्टा स्टोरी डिलीट का केली? खरं कारण आलं समोर

IPL 2023 : विराट कोहलीने आधी पोस्ट करुन नंतर स्टोरी डिलीट का केली? विराटने स्टोरी पोस्ट करताना काय चूक केली? विराट कोहलीने काल तुफान बॅटिंग केली होती.

IPL 2023 : Virat Kohli ने यशस्वी जैस्वालचं कौतुक करणारी इन्स्टा स्टोरी डिलीट का केली? खरं कारण आलं समोर
virat kohli-Yashasvi Jaiswal
| Updated on: May 12, 2023 | 12:19 PM
Share

मुंबई : RCB चा प्रमुख खेळाडू विराट कोहलीने काल यशस्वी जैस्वालची शानदार इनिंग पाहिल्यानंतर त्याचं कौतुक करणारी स्टोरी पोस्ट केली होती. यशस्वी जैस्वालने काल तुफानी बॅटिंग केली. त्याने 47 चेंडूत नाबाद 98 धावा फटकावल्या. यात 12 फोर आणि 5 सिक्स होते. त्याच्या बॅटिंगच्या बळावरच राजस्थानर रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध विजय मिळवला. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून रहाण्याच्या दृष्टीने राजस्थानसाठी विजय आवश्यक होता.

विराट कोहलीला यशस्वी जैस्वालची बॅटिंग खूप आवडली. त्याने आधी त्याच्या इन्स्टाग्रामवर यशस्वीच कौतुक करणारी स्टोरी पोस्ट केली होती. पण नंतर त्याने ती डिलीट केली.

विराटने ती स्टोरी डिलीट का केली?

विराटने यशस्वीच कौतुक करणारी स्टोरी शेयर केली, तेव्हा त्यावर जिओ सिनेमा लिहिलेलं होतं. पण काही सेकंदातच विराटने ती स्टोरी डिलीट केली. कोहलीने त्यानंतर जिओ सिनेमा नाव नसलेली दुसरी पोस्ट रिशेअर केली.

RCB सुपरस्टार विराट कोहली IPL 2023 साठी स्टार स्पोर्ट्सचा ब्रँड अॅम्बेसडर आहे. लाइव्ह स्ट्रिमिंगमध्ये जिओ सिनेमा स्टार स्पोर्ट्सची स्पर्धक आहे. जिओ सिनेमा या नावामुळे कोहली अडचणीत आला असता. विराटने पोस्टमध्ये काय लिहिलेले?

यशस्वी जैस्वालने काल आयपीएलच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक झळकावलं. त्याने 13 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. “अलीकडे, मी पाहिलेली ही सर्वोत्तम बॅटिंग आहे. यशस्वी जैस्वालकडे टॅलेंट आहे” अशा शब्दात विराटने त्याच्या पोस्टमधून राजस्थानच्या युवा ओपनरच कौतुक केलं. कोहलीच्या पोस्टमधील चूक लक्षात येताच, नेटीझन्सनी कमेंट सुरुवात केली. कोहलीला स्टार स्पोर्ट्स बरोबरचा कॉन्ट्रॅक्ट धोक्यात आलाय, असं एक युजरने म्हटलं होतं. आपली चूक लक्षात येताच विराटने ती पोस्ट डिलीट करुन नवीन पोस्ट केली.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!