AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs GT : कॅप्टन रजत पाटीदारची चाबूक खेळी, मात्र मोठी संधी हुकली, काय झालं?

Rajat Patidar Fifty : आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याने गुजरात टायटन्स विरुद्ध चौफेर फटकेबाजी करुन अर्धशतक झळकावलं आहे. रजतला या दरम्यान जीवनदानही मिळालं. रजतने या संधीचा जबरदस्त फायदा घेतला.

RCB vs GT : कॅप्टन रजत पाटीदारची चाबूक खेळी, मात्र मोठी संधी हुकली, काय झालं?
Rcb Rajat Patidar FiftyImage Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 26, 2026 | 11:14 PM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदार याने आयपीएल 2026 स्पर्धेत क्वालिफायर 1 सामन्यात (IPL 2026 Qualifier 1) गुजरात टायटन्स विरुद्ध पहिल्या डावात चाबूक खेळी केली आहे. रजतने धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे. रजतने कृणाल पंड्या याच्यासोबत आरसीबीचा डाव सावरण्यासह फटकेबाजी केली. रजतने यासह हे अर्धशतक पूर्ण केलं. रजतच्या आयपीएल कारकीर्दीतील 19 व्या मोसमातील हे पाचवं अर्धशतक ठरलं. रजतने या अर्धशतकी खेळीनंतर आपला गिअर बदलला आणि गुजरातच्या गोलंदाजांची आणखी वेगाने धुलाई केली. मात्र रजतची एक संधी हुकली. रजत सोबत नक्की काय झालं? जाणून घेऊयात.

आरसीबीची बॅटिंग

गुजरातने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीसाठी विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर या सलामी जोडीने 21 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 38 बॉलमध्ये 72 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर गुजरातच्या जेसन होल्डर याने एकाच ओव्हरमध्ये विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल या दोघांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आरसीबी काहीशी बॅकफुटवर गेली. मात्र त्यानंतर कृणाल पंड्या आणि रजत पाटीदार या दोघांनी आरसीबीला सावरलं.

रजत-कृणालची निर्णायक भागीदारी

रजत आणि कृणाल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 45 बॉलमध्ये 95 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीने आरसीबीच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर रजत पाटीदार यान इतर फंलदाजांसह भागीदारी करत आरसीबीला 255 रन्सपर्यंत पोहचवलं.

रजत पाटीदारची वादळी खेळी

नाबाद परतला मात्र शतकाची संधी हुकली

रजतने आरसीबीसाठी सर्वाधिक आणि नाबाद 93 धावा केल्या. रजतने 33 चेंडूत ही खेळी केली. रजतने या खेळीत तब्बल 9 षटकार आणि 5 चौकार ठोकले. रजतला या दरम्यान शतक करण्याची संधी होती. मात्र रजतची ही संधी अवघ्या 7 धावांनी हुकली. मात्र रजत पाटीदार याच्या या खेळीमुळेच आरसीबीला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचता आलं. त्यामुळे आता आरसीबी हा सामना जिंकणार की गुजरात विक्रमी धावांचा यशस्वी पाठलाग करुन फायनलचं तिकीट मिळवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी