RCB vs GT : विराटचा झंझावात, आरसीबीचं विजयी अर्धशतक, गुजरातचा 5 विकेट्सने धुव्वा
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Match Result, IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुजरातला पराभूत करत 19 व्या मोसमातील आपल्या घरच्या मैदानातील शेवट विजयाने केला आहे. आरसीबीचा हा होम ग्राउंडमधील 50 वा विजय ठरला.

Virat Kohli RCB vs GT IPL 2026
Image Credit source: IPL X Account
अनुभवी फलंदाज विराट कोहली याने केलेल्या 81 धावांच्या चाबूक खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने मात केली आहे. गुजरातने आरसीबीसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 7 बॉलआधी 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. आरसीबीने 18.5 ओव्हरमध्ये 206 धावा केल्या. आरसीबीचा घरच्या मैदानातील अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडियममधील हा 50 तर या मोसमातील एकूण पाचवा विजय ठरला. आरसीबी यासह या हंगामात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सनंतर 5 सामने जिंकणारी तिसरी टीम ठरली.
Follow Us