AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinu Singh | टीम इंडियामध्ये निवड झाल्यावर रिंकू सिंह याचा आणखी एक मोठा धमाका

रिंकू संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 63 चेंडूत 54 धावांची शानदार खेळी केली. त्यात एक चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

Rinu Singh | टीम इंडियामध्ये निवड झाल्यावर रिंकू सिंह याचा आणखी एक मोठा धमाका
Rinku singhImage Credit source: PTI
| Updated on: Jul 25, 2023 | 12:39 AM
Share

मुंबई : आयपीएल 2023 मध्ये सलग पाच सिक्स मारत संघाला विजय मिळवून देणारा रिंकू सिंह सर्वांना माहित आहे. रिंकूने अनेकवेळा आपल्या फलंदाजीमधून त्याची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे रिंकूची आता टीम इंडियामध्ये सहज निवड होणार असं वाटत होतं. मात्र तसं न झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. वेस्ट इंडिजविरूद्ध्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यावर त्यामध्ये रिंकूची निवड करण्यात आली नव्हती. चाहत्यांनी निवड समितीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली होती. मात्र काही दिवसातच रिंकूची एशियन गेम्ससाठी टीम इंडियामध्ये निवड झाली आहे.

रिंकूची टीम इंडियामध्ये निवड झाल्यावर चाहतेही आनंदी झाले, गरिबीतून रिंकूने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे सर्व काही मिळवलं आहे. अशातच रिंकू सिंहे आणखी एक शानदार खेळी करत आपली निवड सार्थ ठरवली असल्याची पावती निवडकर्त्यांना दिली आहे. देवधर ट्रॉफीमध्ये रिंकू सिंहने आक्रमक अर्धशतकी खेळी करत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सेंट्रल झोनकडून सहाव्या नंबरला फलंदाजीला आलेल्या रिंकूने 54 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने दोन सिक्स आणि एक चौकार मारला. रिंकू आणि कर्ण शर्मा या दोघांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सेंट्रल झोन संघाने 207 धावा केलेल्या आणि यामधील सर्वाधिक धावा रिंकू सिंहने केल्या होत्या.

दरम्यान, या सामन्यामध्ये सेंट्रल झोन संघाचा पराभव झाला. ईस्ट झोन संघाने 208 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं. यामध्ये उत्कर्ष सिंग 81 धावा आणि अभिमन्यू इसवरनने 38 धावा करत संघाच्या विजयाचा पाया रचला.

सेंट्रल झोन प्लेइंग 11 : व्यंकटेश अय्यर (C), माधव कौशिक, उपेंद्र यादव, रिंकू सिंग, आर्यन जुयाल (W), कर्ण शर्मा, आदित्य सरवटे, मोहसीन खान, शिवम चौधरी, अनिकेत चौधरी, यश ठाकूर, शिवम मावी, यश कोठारी, यश दुबे, आकाश मडक

ईस्ट झोन प्लेइंग 11 विभागीय पथकः विराट सिंग, अभिमन्यू इसवरन, अभिषेक पोरेल (W), सौरभ तिवारी (C), रियान पराग, सुभ्रांशु सेनापती, शाहबाज अहमद, आकाश दीप, कुमार कुशाग्रा, अविनोव चौधरी, सुदीप कुमार घरामी, मुख्तार हुसेन, उत्कर्ष सिंग, ऋषिंकर दास, मानसिंग दास.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.