शुबमन गिलने कसोटी संघातील मोठा गुंता सामन्याआधीच सोडवला, ऋषभ पंतने सांगितलं की…

शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिक या दरम्यान खेळणार आहे. असं असताना विराट कोहली आणि रोहित शर्माची जागा कशी भरून काढणार हा प्रश्न आहे. असं असताना गिलने सामन्याआधी एक प्रश्न सोडवला आहे.

शुबमन गिलने कसोटी संघातील मोठा गुंता सामन्याआधीच सोडवला, ऋषभ पंतने सांगितलं की...
शुबमन गिल आणि ऋषभ पंत
Image Credit source: Gareth Copley/Getty Images
| Updated on: Jun 18, 2025 | 7:33 PM

भारतासाठी इंग्लंड दौरा हा एक कठीण पेपर असणार आहे. या पेपरातील प्रत्येक प्रश्न सोडण्यासाठी कर्णधार शुबमन गिल याची कसोटी लागणार आहे. पहिलाच कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले मैदानात पहिला कसोटी सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा नसल्याने या प्लेइंग 11 कशी याबाबत उत्सुकता आहे. कारण येथून पुढे प्लेइंग 11 मध्ये या दोघांशिवाय खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. असं असताना विराट कोहली कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजील यायचा. अशा स्थितीत त्याची जागा कोण घेईल? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र त्याची जागा कर्णधार शुबमन गिल घेणार आहे. याबाबतचा खुलासा उपकर्णधार ऋषभ पंत याने केला आहे. बुधवारी सराव शिबिरात भाग घेतल्यानंतर उपकर्णधार शुबमन गिल पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी त्याला पत्रकारांनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण येईल? असा प्रश्न विचारला. यावेळी त्याने उत्तर देत सर्व विषयच संपवून टाकला.

टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल आणि मी पाचव्या क्रमांवर असेन.’ टीम इंडियासाठी ओपनिंग करत शुबमन गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली होती. पण मागच्या दोन वर्षांपासून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. पण आता कर्णधाराने आपल्या बॅटिंग पोझिशनमध्ये बदल केला आहे. इतकंच काय तर ऋषभ पंतच्या फलंदाजीच्या क्रमवारीतही बदल झाला आहे. पण ऋषभ पंतने शुबमन गिलच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण येईल याबाबत खुलासा केला नाही.

ऋषभ पंतने तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूबाबत बोलताना सांगितलं की, या क्रमांकासाठी सध्या टीममध्ये चर्चा सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी दोन नावं चर्चेत आहेत. एक तर साई सुदर्शन आणि दुसरा करूण नायर..यात डावखुऱ्या साई सुदर्शनचा दावा मजबूत असल्याचं बोललं जात आहे. त्याच्याकडे आघाडीला फलंदाजी करण्याचा चांगला अनुभव आहे. करुण नायरला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरवलं जाऊ शकतं.