Rishabh Pant : 20 व्या ओव्हरमध्ये 31 धावा, 4 सिक्स-1 फोर, पंतकडून मोहितची धुलाई

Rishabh Pant 31 Runs Mohit Sharma 20th Over : ऋषभ पंतने मोहित शर्मा याच्या बॉलिंगवर 20 व्या ओव्हरमध्ये वादळी खेळी केली. पंतने 6 बॉलमध्ये दिल्लीच्या खात्यात एकूण 31 धावा जोडल्या.

Rishabh Pant : 20 व्या ओव्हरमध्ये 31 धावा, 4 सिक्स-1 फोर, पंतकडून मोहितची धुलाई
rishabh pant dc vs gt ipl 2024,
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 24, 2024 | 10:59 PM

दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध होम ग्राउंडमध्ये धमाका केला. पंतने अरुण जेटली स्टेडियममध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडला. पंतने 43 बॉलमध्ये 88 धावांची नाबाद खेळी केली. पंतने 204.65 च्या स्ट्राईक रेटने केलल्या 88 धावांच्या खेळीत 8 सिक्स आणि 5 फोर ठोकले. ऋषभ पंतच्या या खेळीमुळे फ्लॉप सुरुवातीनंतरही दिल्ली कॅपिट्ल्सला 20 ओव्हरमध्ये 224 धावांपर्यंत मजल मारता आली.

मोहितच्या 20 व्या ओव्हरमध्ये 31 धावा

ऋषभ पंतने दिल्लीच्या डावातील 18 व्या ओव्हरमध्ये 34 चेंडूत सिक्ससह अर्धशतक पूर्ण केलं. पंतने अर्धशतकानंतर टॉप गिअर टाकला. पंतने 20 व्या ओव्हरमध्ये धमाका केला. पंतने डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मोहित शर्मा याच्या बॉलिंगची पिसं काढली. पंतने शर्माच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 4 सिक्स 1 चौकार आणि 1 वाईडसह 31 धावा मिळवल्या. मोहितने अशाप्रकारे एकूण 4 ओव्हरमध्ये एकही विकेट न घेता 73 धावा दिल्या. मोहितने पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि ओव्हरमध्ये अनुक्रमे 12, 16, 14 आणि 31 धावा दिल्या.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, अझमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा आणि संदीप वॉरियर.