Rishabh Pant : इंग्लंडविरुद्ध शतक झळकावलं, प्रशिक्षक राहुल द्रविडचीही बरोबरी केली, ऋषभ पंतची सामन्यातील कामगिरी जाणून घ्या…

| Updated on: Jul 18, 2022 | 8:14 AM

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्यानं ऋषभ पंतसह पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी करून सामना इंग्लंडच्या तोंडातून काढून घेतला. हार्दिक 71 धावा करून बाद झाला. ऋषभची चांगली चर्चा होती.

Rishabh Pant : इंग्लंडविरुद्ध शतक झळकावलं, प्रशिक्षक राहुल द्रविडचीही बरोबरी केली, ऋषभ पंतची सामन्यातील कामगिरी जाणून घ्या...
ऋषभ पंत
Image Credit source: social
Follow us on

IND vs ENG 3rd ODI  : रविवारी रात्री मँचेस्टरचा 39 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणत भारतानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला. हा निर्णायक सामना जिंकल्यानंतर टीम इंडियानं एकदिवसीय मालिका 2-1 अशी खिशात घातली. भारताच्या विजयाचा हिरो ठरला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant), त्याने 113 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतनं नाबाद 125 धावांची खेळी केली. पंतनं आपल्या शतकाच्या जोरावर प्रशिक्षक राहुल द्रविडशी बरोबरी साधली आणि आशियाबाहेर 100 धावांचा टप्पा गाठणारा तो तिसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला. होय, यापूर्वी हा पराक्रम फक्त राहुल द्रविड आणि केएल राहुलनं केला होता. भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) हा भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून शतक करणारा आशियाबाहेरचा पहिला खेळाडू होता. 1999 मध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्ध 145 धावांची शानदार इनिंग खेळली होती. यानंतर 2020 मध्ये केएल राहुलनं न्यूझीलंडविरुद्ध 112 धावा केल्या आणि या यादीत आपलं नाव नोंदवलं.आता 125 धावांची धडाकेबाज खेळी खेळून आशियाबाहेर शतक ठोकणारा पंत तिसरा भारतीय ठरलाय.

स्पर्धेबद्दल बोलताना रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी यजमानांना 259 धावांत गुंडाळून आपलं काम केलं होतं. पण, लॉर्ड्सप्रमाणेच मँचेस्टरमध्येही पुन्हा एकदा भारतीय आघाडीची फळी अपयशी ठरली. शिखर धवन 1 नंतर रोहित-कोहली 17-17 धावा करून बाद झाले, तर सूर्यकुमार यादवलाही 16 धावा करता आल्या.भारतानं 72 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या, त्यावेळी पुन्हा एकदा टीम इंडियाला बॅटिंग डेप्थचे नुकसान सहन करावे लागेल असे वाटत होते, परंतु पंत आणि हार्दिकने हे होऊ दिले नाही.

हायलाईट्स

  1. 1999 मध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्ध 145 धावांची शानदार इनिंग खेळली
  2. 2020 मध्ये केएल राहुलनं न्यूझीलंडविरुद्ध 112 धावा केल्या
  3. हे सुद्धा वाचा
  4. आता 125 धावांची धडाकेबाज खेळी खेळून आशियाबाहेर शतक ठोकणारा पंत तिसरा भारतीय ठरलाय.

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्यानं ऋषभ पंतसह पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी करून सामना इंग्लंडच्या तोंडातून काढून घेतला. हार्दिक 71 धावा करून बाद झाला, पण दुसऱ्या टोकाला असलेला पंत शतक ठोकण्याच्या मूडमध्ये होता. पंतनं आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक 106 चेंडूत झळकावले.

त्यानंतर भारतीय यष्टीरक्षकाने अधिक आक्रमक फॉर्म दाखवला. डेव्हिड विलीच्या एका षटकात त्यानं 5 चौकार मारले, तर त्याने 43 वे षटक आणले, तर त्याने रूटच्या पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप करून सामना आपल्या शैलीत संपवला.