भारत इंग्लंड कसोटी सामन्यानंतर आयसीसी क्रमवारीत उलथापालथ, ऋषभ पंत-शुबमन गिलला असा झाला फायदा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अर्थात चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. कसोटी मालिकांना सुरुवात झाली असून प्रत्येक सामन्यानंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत उलथापालथ होत आहे. भारत इंग्लंड कसोटी सामन्यानंतर अशीच उलथापालथ झाली आहे. ऋषभ पंत आणि शुबमन गिलला फायदा झाला आहे.

भारत इंग्लंड कसोटी सामन्यानंतर आयसीसी क्रमवारीत उलथापालथ, ऋषभ पंत-शुबमन गिलला असा झाला फायदा
भारत इंग्लंड कसोटी सामन्यानंतर आयसीसी क्रमवारीत उलथापालथ, ऋषभ पंत-शुबमन गिलला असा झाला फायदा
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 25, 2025 | 5:21 PM

भारताने इंग्लंडविरुद्धछ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावला. पण भारताकडून पाच आणि इंग्लंडकडून दोन जणांनी शतकी खेळी केली. यामुळे आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. ऋषभ पंत आणि बेन डकेट यांनी कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रेटिंग मिळवली आहे. पंतला एका तर डकेटला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. पंतने लीड्स कसोटी सामन्यांच्या दोन्ही डावात शतक ठोकलं होतं. त्यामुळे 801 रेटिंगसह सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर बेन डकेटने पहिल्या डावात 60 धावा आणि दुसर्‍या डावात शतक ठोकलं होतं. त्यामुळे त्याला पाच अंकांचा फायदा झाला आहे. बेन डकेट 13व्या स्थानावरून थेट आठव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचं रेटिंग 787 इतकं आहे. दरम्यात इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. तर हॅरी ब्रूक दुसर्‍या स्थानावर आहे. केएल राहुलला देखील शतकी खेळीचा फायदा झाला आहे. त्याला 10 स्थानांचा फायदा झाला आहे. आता थेट 38 व्या स्थानावर पोहोचला आहे.

टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल यालाही पहिल्या डावातील शतकामुळे फायदा झाला आहे. पाच क्रमांक पाठी टाकत 20वं स्थान गाठलं आहे. तर इंग्लंडच्या ओली पोपलाही शतकी खेळीचा फायदा झाला आहे. त्याने 19व्या स्थानावर उडी मारली आहे. दरम्यान, श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला होता. या सामन्यात मुश्फिकुर रहीमने 163 धावा केल्या होत्या. त्याला 11 स्थानांचा फायदा झाला असून 28व्या स्थानावर पोहोचला आहे. तर नजमुल शांतोनो शतक ठोकल्याने 29 व्या स्थानावरून 21व्या स्थानावर पोहोचला आहे.

जसप्रीत बुमराह कसोटी रॅकिंगमध्ये अव्वल स्थानी

जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात कमाल केली. त्याने पहिल्या डावात पाच विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात काही यश मिळालं नाही. पण असं असलं तरी त्याचं पहिलं स्थान कायम आहे. दुसरीकडे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला फायदा झाला आहे. त्याने तीन क्रमांकानी झेप घेत पाचवं स्थान गाठलं आहे.