AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय… रिटायरमेंट घेऊ..? ऋषभ पंतने शेअर केलेल्या व्हिडीओत रोहित शर्मा काय बोलून गेला

महेंद्रसिंह धोनीचे चाहते 15 ऑगस्ट हा दिवस कधीच विसरू शकत नाहीत. कारण त्याने या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा पर्व सुरु झालं. पण त्या दोघांनी वनडे वगळता इतर फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. पण आता ऋषभ पंतने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

काय... रिटायरमेंट घेऊ..? ऋषभ पंतने शेअर केलेल्या व्हिडीओत रोहित शर्मा काय बोलून गेला
काय... रिटायरमेंट घेऊ..? ऋषभ पंतने शेअर केलेल्या व्हिडीओत रोहित शर्मा काय बोलून गेलाImage Credit source: PTI
| Updated on: Aug 15, 2025 | 8:39 PM
Share

टीम इंडियाच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी20 आणि कसोटी फॉर्मेटला रामराम ठोकला आहे. दोघंही आता फक्त वनडे सामने खेळताना दिसणार आहे. त्यामुळे कधी एकदा हे दोघं मैदानात उतरतील याची उत्सुकता आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत दोघं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळले होते. ही स्पर्धा संपून आता सहा महिन्याचा अवधी लोटला आहे. तेव्हापासून आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. आयपीएल स्पर्धेत दोघेही दिसले. पण त्या दरम्यान कसोटी संघातून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे या दोघांना पुन्हा मैदानात पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण सध्या तरी वनडे मालिकाच नाही. असं असताना चॅम्पियन्स ट्रॉफीवेळीचा एक व्हिडीओ ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं. हा सामना भारताने 4 विकेट राखून जिंकला. या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष करण्यात आला. यावेळी ऋषभ पंत व्हिडीओ शूट करत होता. तेव्हा रोहित शर्माने मजेशीर शब्दात ऋषभ पंतला उत्तर दिलं. त्या उत्तराची चर्चा आता सोशल मीडियावर सुरु आहे. या व्हिडीओत ऋषभ पंतने रवींद्र जडेजा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्याही प्रतिक्रिया रेकॉर्ड केल्या आहेत. शेवटी पंत रोहित शर्माला विचारतो की, भावा स्टंप घेऊन कुठे चालला आहेस?

रोहित शर्माने मिश्किल शब्दात पंतला उत्तर देत म्हणाला की, ‘काय… रिटायरमेंट घेऊ का? प्रत्येकवेळी जिंकलो तर रिटायरमेंट घेत बसू का?’ यावर ऋषभ पंतने हसत बोलला की, ‘मला तर वाटते की खेळावं.’ रोहित शर्मा आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिका खेळेल. दरम्यान एका मिडिया रिपोर्टनुसार, हे दोन्ही फलंदाज 2027 च्या विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापनाच्या योजनांचा भाग नाहीत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घ्यावी लागू शकते. दुसरीकडे, बीसीसीआयमध्ये अशीही चर्चा आहे की ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी या दोघांनीही लय परत मिळवावी.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा