Womens World Cup 2025 : महिला ब्रिगेड वर्ल्ड कप जिंकताच हिटमॅन भावूक, रोहितची अशी होती प्रतिक्रिया

Rohit Sharma Emotional : वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर आणि विजय मिळवल्यानंतर कसं वाटतं हे रोहित शर्माला चांगलं माहितीय. भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित भावूक झाला. रोहितचा आभाळाकडे पाहतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

Womens World Cup 2025 : महिला ब्रिगेड वर्ल्ड कप जिंकताच हिटमॅन भावूक, रोहितची अशी होती प्रतिक्रिया
Rohit Sharma Emotional Womens World Cup Final 2025
Image Credit source: Mipaltan x account
| Updated on: Nov 03, 2025 | 2:49 AM

भारतीय महिला संघाला 2005 आणि 2017 साली वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. वूमन्स टीम इंडिया 2017 च्या फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध वर्ल्ड कप ट्रॉफीपासून अवघ्या 9 धावांनी दूर राहिली. तेव्हापासून भारताच्या मनात पराभवाची सल होती. मात्र भारताने तिसर्‍या प्रयत्नात वर्ल्ड कप ट्रॉफीला गवसणी घातली. भारताने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये 2 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेवर मात करत पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला. भारताने 299 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 246 रन्सवर रोखलं. भारत यासह वर्ल्ड कप जिंकणारा चौथा संघ ठरला. भारताने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. विशेष म्हणजे हरमनप्रीतने कर्णधार म्हणून पहिल्याच स्पर्धेत भारताला विश्व विजेता केलं. भारताच्या या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली. भारतीय संघाचं सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जातंय. भारताच्या या विजयानंतर मेन्स टीम इंडियाचा अनुभवी बॅट्समन रोहित शर्मा भावूक झालेला दिसला.

मुलींच्या विजयानंतर रोहित भावूक

भारतीय पुरुष संघाचं 2003 नंतर 2023 साली वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. भारताने सलग सर्व सामने जिंकत फायनलमध्ये धडक दिली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने 2003 च्या जुन्या जखमेवर नव्याने मीठ चोललं. भारत वर्ल्ड कप जिंकता जिंकता राहिला. या पराभवानंतर कॅप्टन रोहितला अश्रू अनावर झाले होते. मात्र भारतीय महिला संघाच्या विजयानंतर रोहितचे डोळे पाणावले. वर्ल्ड कप जिंकणं काय असतं? हे रोहितच्या भावमुद्रेवरुन जाणवत होतं. रोहितच्या चेहऱ्यावर वर्ल्ड कप विजयाचा आनंद पाहायला मिळाला. रोहितचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रोहित हा महामुकाबला पाहण्यासाठी त्याची पत्नी रितिकासह स्टेडियममध्ये आला होता. रोहितने संपूर्ण सामना पाहिला. यावेळेस रोहितसह निता अंबानी उपस्थित होत्या.

भारत वर्ल्ड कप जिंकणारा चौथा संघ

टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवताच क्रिकेट विश्वाला नवा चॅम्पियन मिळणार हे निश्चित झालं. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या 3 संघांनीच वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. आता त्यानंतर भारतीय महिला संघाने या यादीत स्थान मिळवलं आहे.

…आणि रोहित भावूक

शफाली वर्मा POTM

दरम्यान बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान देणाऱ्या शफाली वर्मा हीला वूमन ऑफ द मॅच पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. शफालीने सर्वाधिक 87 धावा केल्या. तसेच निर्णायक क्षणी 2 विकेट्स मिळवल्या.