IND vs SA : शफाली वर्माची फायनलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, लेडी सेहवागचा वर्ल्ड रेकॉर्ड
Shafali Verma World Record : शफाली वर्माला ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र शफालीने अंतिम फेरीत 87 धावांची खेळी करत भारताला अप्रतिम सुरुवात मिळवून दिली. तसेच लेडी सेहवागने या खेळीसह वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे.

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 फायनलमध्ये टीम इंडियाची युवा आणि विस्फोटक ओपनर शफाली वर्मा हीने चाबूक खेळी करत भारताला अप्रतिम सुरुवात मिळवून दिली. शफालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झंझावाती अर्धशतकी खेळी केली. शफालीची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली नव्हती. मात्र उपांत्य फेरीआधी ओपनर प्रतिका रावल हीला दुखापत झाली. प्रतिकाला दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. प्रतिकाच्या जागी शफालीला संधी देण्यात आली. शफालीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरीत काही खास करता आलं नाही. शफाली 10 धावा करुन बाद झाली. मात्र शफालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील महामुकाबल्याला 2 तास विलंबाने सुरुवात झाली. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शफालीला सेमी फायनलमध्ये मोठी खेळी करता आली नव्हती. त्यामुळे शफालीकडून अंतिम सामन्यात मोठी खेळी अपेक्षित होती. शफालीने चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवला आणि भारताला स्मृती मंधानासह सलामी शतकी भागीदारी करुन दिली.
शफालीचा वर्ल्ड रेकॉर्ड
शफालीने वयाच्या 21 व्या वर्षी 49 चेंडूत एकदिवसीय कारकीर्दीतील 5 वं अर्धशतक पूर्ण केलं. शफालीने तब्बल 3 वर्षांनंतर अर्धशतक झळकावलं. शफालीने अर्धशतकासाठी 49 चेंडूंचा सामना केला. शफालीने अर्धशतकी खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. शफालीने या अर्धशतकासह इतिहास घडवला. शफाली वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्धशतक करणारी सर्वात युवा फलंदाज ठरली. शफालीने वयाच्या 21 वर्ष 278 व्या दिवशी वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्धशतक करणारी सर्वात युवा फलंदाज हा बहुमान मिळवला.
स्मृतीसह शतकी भागीदारी
स्मृती आणि शफाली या दोघींनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मात्र स्मृती आऊट होताच या भागीदारीला ब्रेक लागला. स्मृतीच्या रुपात भारताने 104 रन्सवर पहिली विकेट गमावली. स्मृतीने 45 रन्स केल्या.
शफाली वर्माची ऐतिहासिक कामगिरी
Second-fastest 5⃣0⃣ in a women’s ODI WC final ✅ Youngest to score a 5⃣0⃣ in an ODI World Cup final ✅
Shafali Verma’s fiery 87 set the tone for #TeamIndia 👏
Updates ▶ https://t.co/TIbbeE4ViO#WomenInBlue | #CWC25 | #INDvSA | #Final | @TheShafaliVerma pic.twitter.com/gLxuVCTZyA
— BCCI Women (@BCCIWomen) November 2, 2025
शफालीने स्मृतीनंतर जेमीमा रॉड्रिग्ससह भारताचा स्कोअर हलता ठेवला. शफालीने या दरम्यान फटकेबाजी सुरुच ठेवली. त्यामुळे शफालीची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु होती. शफालीचं अंतिम फेरीत शतक पाहण्यासाठी चाहते उत्सूक होते. मात्र शफाली शतकाआधीच आऊट झाली. शफाली शतकापासून 13 धावा दूर राहिली. शफालीने 78 बॉलमध्ये 87 रन्स केल्या. शफालीने या खेळीत 7 फोर आणि 2 सिक्स लगावले.
