‘वडा पाव खाणार का?’ या ऑफरवर रोहित शर्माची भन्नाट रिॲक्शन व्हायरल, विजय हजारे ट्रॉफीतील तो Video पाहिला का?

Rohit Sharma on Vada Pav Offer: सध्या विजय हजारे ट्रॉफीची देशभरात चर्चा आहे. या ट्रॉफीत अनेक रेकॉर्ड भूईसपाट झाले. तर काही नवीन विक्रम रचल्या गेले. विजय हजारे ट्रॉफीत अजून एक भन्नाट किस्सा घडला. रोहित शर्माने शतक ठोकले. तर त्याला वडा पावची ऑफर आली, तेव्हा त्याने अशी रिॲक्शन दिली.

वडा पाव खाणार का? या ऑफरवर रोहित शर्माची भन्नाट रिॲक्शन व्हायरल, विजय हजारे ट्रॉफीतील तो Video पाहिला का?
रोहित शर्मा, वडापाव
| Updated on: Dec 25, 2025 | 4:20 PM

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. बिहार आणि वैभव सूर्यवंशींच्या रेकॉर्डने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे. तर भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा सात वर्षांनी विजय हजारे ट्ऱॉफीत खेळत आहे. सिक्कीम संघाविरोधात रोहितने तुफान खेळी केली. त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याच्या दमदार शतकावर मुंबई संघाने विजय खेचून आणला. तर क्षेत्ररक्षण करताना एक मजेदार किस्सा घडला, त्याची समाज माध्यमावर एकच चर्चा सुरू आहे. याविषयीची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रोहितची धमाकेदार कामगिरी

जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये हा सामना रंगला. सिक्कीम संघाने अगोदर फलंदाजी केली. 50 षटकांमध्ये या संघाला 236 धावा करता आल्या. तर मुंबईसाठी रोहित शर्माने दमदार फलंदाजी केली. त्याच्या एकट्याच्या जोरावर मुंबई संघाने जणू विजय खेचून आणला. रोहितने 94 चेंडूवर नाबाद 155 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 18 चौकार आणि 9 षटकार ठोकले. त्याने अवघ्या 62 चेंडूत शतक ठोकले. त्याच्या जीवनातील हे सर्वात वेगवान शतक होते. त्याच्या दमदार खेळीमुळे मुंबईने विजय स्वतःच्या नावावर नोंदवला.

वडा पावची मिळाली ऑफर

हा सामना पाहण्यासाठी या मैदानावर मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. हा सामना सुरु असताना एक खास किस्सा घडला. जेव्हा रोहित शर्मा सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा एका चाहत्याने त्याला जोरात आवाज दिला आणि वडा पाव खाणार का? असे विचारले. तेव्हा रोहित खुदकन हसला. त्याने हात हालवत नाही असे सांगितले. त्याचा हा किस्सा साधा असला तरी त्याची रिॲक्शन इंटरनेटवर एकदम व्हायरल झाली आहे. चाहत्यांनी या या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. त्या कमेंट्स वाचल्यावर तुम्हाला ही हासण्याचा मोह आवरला नाही.

रोहित शर्माचे विजय हजारे ट्रॉफीमध्ये धुमशान

रोहित शर्मा याचे विजय हजारे ट्रॉफीशी खास नाते आहे. रोहित 2008 मध्ये पहिल्यांदा या ट्रॉफीत खेळला. मुंबईसाठी शतक ठोकत त्याने स्वतःची वेगळी ओळख उमटवली. तर आता त्याने दुसरे शतक पूर्ण केले आहे. 2008 मध्ये त्याने तामिळनाडूविरोधात शतक ठोकले आणि तेव्हा पण मुंबई संघ जिंकला होता.