
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला 19 ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिकेने सुरुवात होणार आहे. या मालिकेतून टीम इंडियाची अनुभवी जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं कमबॅक होणार आहे. या दोघांना एक्शन मोडमध्ये पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आसुसले आहेत. या दौऱ्याआधी रोहितने असंख्य क्रिकेटपटूंचं पालणाघर अशी ओळख असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात शुक्रवारी 10 ऑक्टोबरला सराव केला. या दरम्यान रोहित छोट्या चाहत्याला त्याच्या जवळ येण्यापासून रोखल्याने सुरक्षारक्षकावर चांगलाच तापला. तसेच चाहत्याला आपल्या जवळ येऊ दिलं. रोहितचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोहितने सरावासाठी शिवाजी महाराज पार्कची निवड केली. रोहितसोबत त्याचा जिगरी मित्र अभिषेक नायर आणि अन्य सहकारी होते. रोहितचा सराव सुरुच होता. “रोहित पार्कात सरावासाठी आलाय” ही बातमी पाहता पाहता चाहत्यांमध्ये पसरली. त्यानंतर रोहितची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी ही गर्दी केली. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना पाहण्याचं स्वप्न सर्वसामान्य चाहत्यांचं असतं. त्यात रोहित म्हटल्यावर विषयच नाही. चाहत्यांना या नेट्स प्रॅक्टीसमुळे रोहितला जवळून पाहण्याची संधी मिळाली.
रोहित या सरावादरम्यान विश्रांती करत होता. तेव्हा एका छोट्या चाहत्याने रोहितच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा सुरक्षा रक्षकाने त्या छोट्या चाहत्याला रोहितजवळ जाण्यापासून रोखलं. रोहितला हा सर्व प्रकार लक्षात येताच तो चांगलाच संतापला. रोहित छोट्या चाहत्याला त्याच्या जवळ येण्यापासून रोखल्याने सुरक्षा रक्षकावर “ये…..”, अशा शब्दात ओरडला. त्यानंतर त्या सुरक्षा रक्षकाने चाहत्याला रोहितजवळ जाऊ दिलं.
रोहितने छोट्या चाहत्याला आपल्या जवळ बोलावलं. आपल्याला जवळ बोलावलं म्हणून छोटा चाहता आनंदी झाला. रोहितच्या या कृतीने उपस्थित चाहत्यांची मनं जिंकली. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोहित संतापला
A security guard stopped a kid a bit too harshly, Rohit immediately intervened and asked him to let the kid come. 🥹🤌🏻
Truly Ro is one of the kindest souls. ❤️
— Rohan💫 (@rohann__45) October 10, 2025
दरम्यान बीसीसीआय निवड समितीने गेल्या शनिवारी 4 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने यासह एकदिवसीय संघाचा कर्णधार बदलल्याची घोषणाही केली. बीसीसीआयने रोहितकडे असलेलं कर्णधारपद काढून घेतलं. तर शुबमन गिल याला कसोटीनंतर एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियात रोहित शर्मा शुबमन गिल याच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे.