IPL 2025 दरम्यान रोहित, सूर्या-हार्दिक मुंबईची साथ सोडून कुणाला भेटले? फोटो व्हायरल

IPL 2025 : हार्दिक पंड्या, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या तिघांनी आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान कोट्याधीश व्यक्तीची भेट घेतली आहे. जाणून घ्या

IPL 2025 दरम्यान रोहित, सूर्या-हार्दिक मुंबईची साथ सोडून कुणाला भेटले? फोटो व्हायरल
Hardik Pandya Suryakumar Yadav Mi Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 09, 2025 | 9:20 PM

मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 18 व्या मोसमात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मुंबईने या मोसमात आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. मुंबईला त्यापैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. तर पलटणला 4 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. मुंबईला शेवटच्या सामन्यात 7 एप्रिलला आरसीबीविरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर आता मुंबईचा पुढील सामना थेट रविवारी 13 एप्रिलला दिल्ली कॅपिट्ल्सविरुद्ध होणार आहे. या दरम्यान टीममधील 3 प्रमुख खेळाडूंनी मुंबईची साथ सोडून एका कोट्यधीश व्यक्तीची भेट घेतली आहे.

रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव हे तिघेही आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान मुंबई टीमपासून काही वेळेसाठी बाहेर पडले. या तिघांनी आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्यासह दुबईचे क्राउस प्रिंस शेख हमदान बिन मोहम्मद यांची भेट घेतली. विशेष म्हणजे या तिघांनी टीम इंडियाचे खेळाडू म्हणून प्रिंस शेख यांची भेट घेतली. प्रिंस शेख यांचं नेटवर्थ हे 33, 500 कोटी असल्याचं म्हटंल जातं.

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या तिघांनी या भेटीत टीम इंडियाची खास टी शर्ट परिधान केलं होती. ही भेट भारत-यूएई क्रिकेटच्या दृष्टी महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने आपले सामने हे दुबईतच खेळले होते.

हमदान बिन मोहम्मद यांच्याबाबत थोडक्यात

शेख हमदान बिन मोहम्मद हे जगभरात ‘फजा’ या नावानेही ओळखले जातात. शेख हमदान बिन मोहम्मद हे यूएईचे संरक्षण मंत्री आहेत.

मुंबईची दुरावस्था

दरम्यान मुंबईची आयपीएलच्या या 18 व्या मोसमात निराशाजनक सुरुवात राहिली. मुंबईने पहिले 2 सामने गमावले. त्यानंतर मुंबईने तिसऱ्या सामन्यात केकेआरवर 8 विकेट्सने मात करत विजयाचं खातं उघडलं. मात्र त्यानंतर मुंबईला लखनौ आणि आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला.

मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.