AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेताच पत्नी रितिका सजदेह झाली व्यक्त, म्हणाली…

देशात ऑपरेशन सिंदूरची चर्चा रंगली असताना अचानक रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जून महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. अशा स्थितीत निवृत्ती घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे, रोहित शर्माच्या निर्णयानंतर पत्नी रितिकाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेताच पत्नी रितिका सजदेह झाली व्यक्त, म्हणाली...
रोहित शर्मा आणि रितिका सजदेहImage Credit source: Instagram/Rohit Sharma
| Updated on: May 07, 2025 | 9:20 PM
Share

रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. जून महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार या भ्रमात क्रीडाप्रेमी होते. मात्र अचानक रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. प्रत्येक जण असं अचानक कसं काय झालं? असा प्रश्न करून व्यक्त होत आहे. रोहित शर्मा सध्या 38 वर्षांचा असून त्याने 67 कसोटी सामन्यात 4301 धावा केल्या आहेत. यात त्याने 12 शतकं आणि 18 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी ही 40.57 इतकी आहे. रोहित शर्माने निवृत्ती जाहीर करताना सोशल मीडियावर लिहिलं की, ‘सर्वांना नमस्कार, मी कसोटीतून निवृत्त झालो आहे हे तुमच्यासोबत शेअर करायच आहे. पांढऱ्या कपड्यात कसोटीत देशाचं नेतृत्व करणं ही खरंच अभिमानास्पद बाब आहे. तुम्ही इतकी वर्षे दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. मी भारताचं वनडे क्रिकेटमध्ये नेतृत्व करणार आहे.’ असं असताना रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रितिका सजदेरने रोहित शर्माची पोस्ट आपल्या स्टोरीमध्ये शेअर केली आहे. तसेच त्या पोस्ट खाली हृदय भंग झाल्याचे इमोजी टाकले आहेत. तसेच एका इमोजीतून सलाम ठोकला आहे. तर एका इमोजीत डोळ्यात पाणी दिसत आहे. या चार इमोजीवरून रितिका व्यक्त झाली आहे. मागच्या वर्षी टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने या फॉर्मेटला रामराम ठोकला होता. त्यानंतर वनडे आणि कसोटी खेळणार हे स्पष्ट केलं होतं. पण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी गमावल्यानंतर रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार ही चर्चा रंगली होती. तत्पूर्वी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

Ritika_Post

रोहित शर्माने टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तर वनडे क्रिकेट खेळणार असल्याचं सांगितलं आहे. म्हणजेच रोहित शर्मा 2027 साली होणाऱ्या वनडे वर्ल्डकप संघात असेल आणि नेतृत्व करेल असे संकेत मिळत आहेत. पण आता याबाबत येणाऱ्या काळात काय ते स्पष्ट होईल. रोहित शर्माचा फॉर्म आणि फिटनेस या दोन गोष्टी वनडे वर्ल्डकपसाठी महत्त्वाच्या ठरतील. या दरम्यान होणाऱ्या वनडे मालिका रोहित शर्मच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतील.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...