RCB vs LSG Live Streaming : लखनौ तिसऱ्या विजयासाठी सज्ज, आरसीबी विरुद्ध जिंकणार?

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants IPL 2026 Live Scorecard : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 19 व्या मोसमात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे लखनौ आरसीबीला पराभूत करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

RCB vs LSG Live Streaming : लखनौ तिसऱ्या विजयासाठी सज्ज, आरसीबी विरुद्ध जिंकणार?
RCB vs LSG IPL Live Streaming
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 15, 2026 | 3:55 AM

गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 23 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध भिडणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील पाचवा सामना असणार आहे. रजत पाटीदार याच्याकडे आरसीबीच्या नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे. तर विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व करणार आहे. आरसीबीने खेळलेल्या 4 पैकी 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर लखनौला 2 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. तर लखनौने तितकेच सामने जिंकले आहेत. त्यामुळे लखनौ आरसीबीला त्यांच्या घरात पराभूत करत मोसामातील तिसरा विजय मिळवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे आपण जाणून घेऊयात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना कधी?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना बुधवारी 15 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना कुठे?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना आरसीबीच्या होम ग्राउंडमध्ये होणार आहे. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता कोणती टीम बॅटिंग करणार आणि कोण फिल्डिंग करणार हे निश्चित होईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

विराट-पंत आमनेसामने

आरसीबी-लखनौ सामन्यानिमित्ताने टीम इंडियातील विराट कोहली आणि ऋषभ पंत हे 2 स्टार खेळाडू आमनेसामने असणार आहेत. विराटने या हंगामात 4 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह एकूण 179 धावा केल्या आहेत. तर पंतने 4 मॅचेसमध्ये 1 अर्धशतकासह एकूण 103 रन्स केल्या आहेत. आता बुधवारी होणाऱ्या या सामन्यात दोघांपैकी कोण सरस ठरतो? याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

Follow Us