AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs AFG : दक्षिण अफ्रिका अफगाणिस्तान सामन्यात हे 11 खेळाडू देतील नशिबाची साथ! जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी

World Cup 2023, SA vs AFG :वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात 42 वा सामना होत आहे. या सामन्यात कोणते खेळाडू छाप सोडू शकतात, याचा एक अंदाज बांधता येईल. चला जाणून घेऊयात याबाबत सविस्तर

SA vs AFG : दक्षिण अफ्रिका अफगाणिस्तान सामन्यात हे 11 खेळाडू देतील नशिबाची साथ! जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी
SA vs AFG : अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामन्यात कर्णधार उपकर्णधार असा निवडा! पॉइंट्सच्या गणितात होईल मदत
| Updated on: Nov 09, 2023 | 2:53 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीच्या एका स्थानासाठी जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. न्यूझीलंड श्रीलंका सामन्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल. पण न्यूझीलंडचा संघ सामना हरला तर मात्र पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांना संधी मिळणार आहे. जर तरच गणित बाजूला ठेवून अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका या सामन्यावर लक्ष केंद्रीत करुयात. अफगाणिस्तानने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं असतं पण ग्लेन मॅक्सवेलनं बाजी पलटून टाकली. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेने आतापर्यंत साखळी फेरीत एकच सामना गमावला आहे. तो पण नेदरलँडकडून..त्यामुळे बांगलादेश दक्षिण अफ्रिका सामन्यात काहीही होऊ शकतं. दक्षिण अफ्रिका या सामन्यात वरचढ असेल. पण अफगाणिस्तानला कमी लेखून चालणार नाही.

वनडे क्रिकेट कारकिर्दीत दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान एकदाच समोरासमोर उभे ठाकले आहेत. या सामन्यात दक्षिण अफ्रिगेने विजय मिळवला होात. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच दोन संघ आमनेसामने असणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. पण फिरकीची जादू चालली तर दिलेला स्कोअर गाठणं कठीण आहे.

ड्रीम इलेव्हन 1

  • विकेटकीपर – क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज
  • फलंदाज – रॅसी व्हॅन डर डुसेन (कर्णधार), इब्राहिम जादरान
  • अष्टपैलू – एडन मार्कराम (उपकर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, मोहम्मद नबी
  • गोलंदाज – केशव महाराज, कागिसो रबाडा, राशिद खान

ड्रीम इलेव्हन 2

  • विकेटकीपर – क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज
  • फलंदाज – रॅसी व्हॅन डर डुसेन, इब्राहिम जादरान (उपकर्णदार)
  • अष्टपैलू – एडन मार्कराम (कर्णधार), अजमातुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन
  • गोलंदाज – केशव महाराज, कागिसो रबाडा, राशिद खान, जेराल्ड कोटझी

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डेर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, जेराल्ड कोटेझी, लिझार्ड विल्यम्स, कागिसो रबाडा.

अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमातुल्ला ओमरझाई, इक्रम अलखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी, नूर अहमद.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.