
दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 21 व्या सामन्यात बांगलादेशमोर गुडघे टेकले आहेत. नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना लो स्कोअरिंग सामना पाहायला मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेला बांगलागदेशमोर 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 113 धावांपर्यंत मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकने बांगलादेशसमोर नाचक्की करुन घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेची ही टी 20 वर्ल्ड कप इतिहासातील निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. त्यामुळे आता बांगलादेशला विजयासाठी 114 धावांचं आव्हान मिळालं आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. दोघे भोपळाही फोडू शकले नाहीत. तर तिघांनी एकेरी धावसंख्येवरच समाधान मानलं. हेन्रिक क्लासेन याने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. क्लासेनच्या खेळीत 3 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. तर डेव्हिड मिलरने 29 धावांचं योगदान दिलं. मिलरने 1-1 सिक्स आणि फोर ठोकला. क्लासेन आणि मिलर या दोघांनी सातव्या पाचव्या विकेटसाठी 80 बॉलमध्ये 79 धावांची भागीदारी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 100 पार मजल मारता आली.
तर क्विटंन डी कॉक याने 11 बॉलमध्ये 18 धावा केल्या. रिझा हेंड्रीक्स आणि ट्रिस्टन स्टब्स यादोघांना खातंही उघडता आलं नाही. कॅप्टन एडन मारक्रम याने 4 धावा केल्या. तर मार्को जान्सेन आणि केशव महाराज ही जोडी नाबाद परतली. मार्को जान्सेन याने 5 आणि केशव महाराजने 4 धावा केल्या. बांगलादेशकडून तांझिम हसन साकिब याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तास्किम अहमद याने 2 विकेट्स घेतल्या. तर रिशाद हौसेन याने 1 विकेट घेतली.
113-6 विरुद्ध, बांगलादेश, 10 जून
113-9 विरुद्ध, टीम इंडिया, 2007
118-9 विरुद्ध, ऑस्ट्रेलिया, 2021
122-9 विरुद्ध, विंडिज, 2016
128-7 विरुद्ध, न्यूझीलंड, 2009
बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला रोखलं
Bangladesh shine in New York 👏
A brilliant bowling performance restricts South Africa to 113/6 from their 20 overs.#T20WorldCup | #SAvBAN | 📝: https://t.co/CpHKusewHS pic.twitter.com/MpFAg960tn
— ICC (@ICC) June 10, 2024
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन: नजमुल हौसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), तौहीद ह्रदोय, शकीब अल हसन, जाकेर अली, महमुदुल्ला, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया आणि ओटनील बार्टमन.