AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND : टीम इंडियाचा 3-1 ने धमाकेदार मालिका विजय, दक्षिण आफ्रिकेचा चौथ्या सामन्यात 135 धावांनी खुर्दा

South Africa vs India 4th T20i : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर चौथ्या टी 20i सामन्यात 135 धावांनी धमाकेदार विजय मिळवत मालिकेवर नाव कोरलं आहे. भारताने 3-1 अशा फरकाने मालिका जिंकली आहे.

SA vs IND : टीम इंडियाचा 3-1 ने धमाकेदार मालिका विजय, दक्षिण आफ्रिकेचा चौथ्या सामन्यात 135 धावांनी खुर्दा
team india suryakumar yadavImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Nov 16, 2024 | 12:51 AM
Share

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर जोहान्सबर्ग येथे चौथ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात 135 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 284 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेला धड 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 18.2 ओव्हरमध्ये 148 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिका 3-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. संजू सॅमसन आणि आणि तिलक वर्मा हे दोघे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 283 धावा केल्या. अभिषेक शर्मा 36 धावांवर बाद झाला. त्यानंतर संजू आणि तिलक या दोघांनी 210 धावांची नाबाद भागीदारी केली. संजूने 56 चेंडूत 9 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 109 धावा केल्या. संजूच्या कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं. तर तिलकने 47 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 9 फोरसह नॉट आऊट 120 रन्स केल्या. तिलकचं हे एकूण आणि सलग दुसरं शतक ठरल. तर दक्षिण आफ्रिकेकडून लुथो सिपामला याला एकमेव विकेट मिळाली.

दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग

विजयी धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्स 43, डेव्हिड मिलर 36, मार्को जान्सेन नॉट आऊट 29 आणि गेराल्ड कोएत्झी याने 12 धावा केल्या. या चौघांलव्यतिरिक्त इतर सर्व फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्थी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या, रमनदीप सिंह आणि रवी बिश्नोई या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.

क्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.

Follow Us
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...