SA vs IND | टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या सामन्यातही जोरदार पाऊस, मॅच रद्द होणार?
India vs South Africa 2nd T20 Rain Weather Update | पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे.

ग्वेबेऱ्हा | टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील डरबनमध्ये आयोजित करण्यात आलेला पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. आता दुसरा सामना हा मंगळवारी 12 डिसेंबर रोजी ग्वेबेऱ्हा येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. या दरम्यान एक वाईट बातमी समोर आली आहे. दुसऱ्या सामन्याचं आयोजन जिथे करण्यात आलं आहे, तिथे सकाळपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे आता या मालिकेचंही समीकरणही फिस्कटण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेला विरुद्ध टीम इंडिया दुसऱ्या सामन्याला स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र त्या वेळेला पावसाचं अंदाज नाही. तसेच दुपारी स्थानिक वेळेनुसार 2 वाजेपर्यंत पाऊस थांबला होता. मात्र ढगाळ वातावरण असल्याने काही वेळ सामना होण्याची शक्यता होती. आता पाऊस कधीपर्यंत थांबतो याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे. तर दुसऱ्या बाजूला स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता सामन्यातील दुसऱ्या डावादरम्यान पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल डीएलएसनुसार होऊ शकतो.
हवामानाचा अंदाज काय?
एक्युवेदरनुसार, स्थानिक वेळेनुसार सामन्याला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. सामना सुरु होण्याच्या वेळेस पावसाची शक्यता 48 टक्के इतकी आहे. तर स्थानिक वेळेनुसार 6 वाजता 30-40 टक्के पावसाची शक्यता आहे. तसेच सामन्याला वेळेनुसार 2 तास विलंब झालं तरी सामना किमान 5-5 ओव्हरचा होऊ शकतं. तसंही झालं नाही तर पहिल्या टी 20 प्रमाणे दुसरा सामनाही रद्द होऊ शकतो.
दक्षिण आफ्रिका 20 टीम | एडेन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.
