SA vs IND Test Series | टीम इंडिया टेस्ट सीरिजसाठी सज्ज, रोहितसेनेची मोठी ‘कसोटी’
South Africa vs India Test Series | रोहित शर्मा याने आतापर्यंत टीम इंडियासाठी उल्लेखनीय आणि अफलातून कामगिरी केलीय. आता रोहितसमोर गेल्या 20 वर्षात कुणालाच जे जमलं नाही ते करण्याचं आव्हान आहे.

केप टाऊन | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली. त्यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत मालिका जिंकली. टीम इंडियाला 2018 नंतर यंदा वनडे मालिका जिंकण्यात यश आलं. त्यानंतर आता दोन्ही संघात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. टीम इंडियाची या सीरिजमध्ये कसोटी लागणार आहे.
उभयसंघात अर्थात टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये भिडणार आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान पार पडेल. हा सामना सेंच्युरियनमध्ये खेळवण्यात येणार आहे. ही बॉक्सिंग डे टेस्ट असणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान होईल.
टीम इंडियाची कसोटी का?
टीम इंडियाला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्ध 1992 पासून ते आतापर्यंत 2022 पर्यंत एकूण 8 कसोटी मालिका खेळल्या आहेत. या 8 पैकी एक मालिका बरोबरीत राहिली आहे. तर 7 मालिकेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागलाय. टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात 2010-2011 मध्ये 1-1 ने मालिका बरोबरीत सोडवली होती.
टीम इंडियाने अखेरची कसोटी मालिका ही 2021-2022 मध्ये विराट कोहली याच्या नेतृत्वात खेळली होती. तेव्हा टीम इंडियाला ही मालिका 1-2 ने गमवावी लागली होती. आता टीम इंडिया यंदा पहिल्यांदाच रोहित शर्मा याच्या नेतृत्वात कसोटी खेळणार आहे. रोहित शर्मा याच्यासमोर टीम इंडियाला ही मालिका जिंकवण्याचं आव्हान असेल. तसेच टीम इंडियात असे अनेक खेळाडू आहेत, जे पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत खेळणार आहेत. त्यामुळे रोहितसमोर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून चांगली कामगिरी करवून घेण्याचं आव्हान असणार आहे.
दोघे आऊट, तिसरा तयारीत
दरम्यान कसोटी मालिकेतून टीम इंडियाच्या मोहम्मद शमी आणि ईशान किशन या दोघांना माघार घेतली आहे. मोहम्मद शमी याला दुखापत झाली आहे. तर ईशान किशन वैयक्तिक कारणामुळे खेळणार नाही. तर ऋतुराज गायकवाड बोटाच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.
